Categories: Uncategorized

*** 🌹 गजरा 🌹*****

( कळी ते फुल… अन फुल ते माळी एक प्रवास )
अगदी तसं बघायला गेलं तर गजरा नुसतं नाव ऐकलं तरी तो मोगऱ्याचा मोहक सुवास त्याचा थोडा तरी भास झाल्याशिवाय राहत नाही कारण गजरा म्हणजे पुन्हा पुन्हा फुलांनी एकत्र येणे आपल्या प्रिय व्यक्तीच्या सोबतीने एकत्र राहण्याचा संदेश ते आपल्याला देतात आणि हा गजरा आपल्या प्रिय व्यक्तीला भेट दिल्यावर जोडीदाराचा राग रुसवा काढून पुन्हा नव्याने प्रेम करायला शिकवतो आता आपण गजऱ्याची थोडीशी पार्श्वभूमी पाहू
कारण गजरा हा प्रत्येक सखीचा प्रिय सखा… अल्लड वयात स्वप्न दुनियेत घेऊन जाणारा…नवरा बायकोच्या रुसव्यातील गोडवा…सखीच्या वेणीत सजणारा…मोहकसा आणि हाच गजरा हातात सजून मैफिलीची शान वाढवणारा…गजरा तितकाच सुंदर अलौकिक…मोहक असा सुगंधित प्रिय धागा… देव्हार्‍याच्या गाभाऱ्यापासून कळसापर्यंत दिमाखाने सजणारा हा गजरा…सगळ्यांच्या ह्रदयात मनात चिंतनात आपलं अढळ स्थान स्थापित करून असतो स्त्रीचं सौंदर्य या आभूषणाशिवाय अधूरच आहे सण…उत्सव…लग्न…कोणताही समारंभ…असो गजरा नसला तर त्याला शोभा नाही प्रत्येक सखीचं या गजऱ्या सोबत एक घट्ट नातं असतं कारण लहान असताना टी व्ही वर एक ठराविक वेळी पाहण्याची आणि चॅनलचा रतीब न घालणारी एक करमणुकीची सोय होती त्यावेळी दूरदर्शनवर गजरा नावाचा कार्यक्रम सादर व्हायचा या कार्यक्रमामुळे गजरा हा शब्द तो खराखोर फुलांचा गजरा डोळ्यांनी बघायच्या आधी कळाला
आणि दुसरी बाब म्हणजे गजरा म्हणजे फुलांच्या छोट्या माळी सारखा केसात माळायचा आभूषणाचा एक प्रकार सहसा स्त्रियांमध्ये प्रचलित असलेल्या वेणी…अंबाडा इत्यादी केश रचनामध्ये गुंफला जातो गजरा बहुतेक मोगरा या फुलांचा असतो तसंच यामध्ये अबोली या फुलाचा सुद्धा वापर करतात गजरा ही फुलांची माळ आहे विवाह सोहळ्यात किंवा दररोज केलेल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये वैभवाने ही धारण केली जाते ते सहसा गुलाब…मोगरा… चमेली…अबोली…अशी वेगवेगळी फुले वापरून बनवतात हे केसाच्या जुड्यावर किंवा वेणीमध्ये गुंफून परिधान केले जाऊ शकतात गजरा सहसा पारंपारिक पोशाखांबरोबर घालतात
आणि मी पण जरा गजरा या शब्दावर थोडा विचार केला गजरा काय फुले धाग्यात गुंफून तयार होतो आणि माझ्याकडे तर फुलं नाहीत पण शब्दच शब्द आहेत त्यांची तर सारखी मेजवानी असते तेव्हा आता आपण शब्दांचा गजरा बनवू ते कसं कोऱ्या कागदाच्या शुभ्र बागेत शब्दांचा मी ओवून गजरा… पटकन नटकन थोडसं ओरडून… माफक दरात विकतो जरा…तुम्हाला पाहिजे त्या किमतीला घ्या.. शब्द ताजे आणलेत वेचून… रंगीत आहेत सुगंधी आहेत राहतील नाहीतर असेच साचून… हा बघा बालपणाच्या फुलांचा वास… सुंदर आईच्या मायेचा… गोष्टीतल्या सुंदर परी सारखा..शाळेतल्या फुलांचा हा गजरा…निघून जेव्हा वास घ्याल…लाकडीबाक अन शिकवणाऱ्या बाई…सगळं काही सोबत न्याल …बर हा घ्या मित्रांच्या फुलाचा गजरा…सुगंध याचा बराच काळ टिकेल.एकदा तरी घेऊन बघा हर एक चिंता आपोआप मिळेल… हा एक अस्सल गजरा प्रेम नावाच्या दुर्मिळ फुलाचा…नशीबवानच माणूस हा माळू शकतो…नाहकतेचा धागा याचा… खूप फुले वेगवेगळे वास…कागदांच्या पुडीत बाहेर घमघमणारा मंद सुवास…ज्याला जो हवा आठवणीच्या क्लिपने माळा तसा… एखादा तरी गजरा घ्या कोणी फक्त घेता वास लांबूनी…मी तरी कसा ठेवू हा घमघमाट स्वतःकडे दाबूनी…दिवसा अखेर कमाई शून्य… शब्दांना माझ्या किंमत नाही… मी का असो का अजून कोणी…कोरेचं शब्द अन कोरीचं वही…कारण माझ्या शब्दाच्या मेजवानीचा माझा प्रत्येक रसिक जण घेतोय आस्वाद…कधी कधी मला अन माझ्या शब्दांना पण डोक्यावर घेतोय तोच खरा माझा रसिक…तोच खरा माझा रसिक…तसं बघायला गेलं तर माझ्या शब्दांची हल्ली दररोजच पंगत उठते आणि आणखीन एक गजऱ्याबद्दल बोलायचं झालं तर गजरा म्हटल्यावर डोळ्यासमोर काय येत असेल एक अबोल अबोली सारखा कधी मोगऱ्यासारखा शांतच पण आपल्या सुगंधाने मोहित करणारा विविध प्रकारचे विविध फुलांचे गजरे आणि हो त्यांचे भान सुद्धा आणि मान सुद्धा वेगळेच असतात गजऱ्यात तेचं मात्र रूपं वेगवेगळे कधी दोऱ्याने बांधलेला तर कधी सुईने पुरवलेला सर्व फुले एकत्र येतात तेव्हा बनतो गजरा दोन रंगाचा तर कधी एकाच रंगाचा
विविधतेच्या विविध फुलांचा बांधली जातात फुले एका विशिष्टतेने त्याचं सौंदर्य देखील अजून खुलतं यात कळी ते फुल आणि फुल ते माळी माळ्याच्या हातात हा गजरा त्याचा प्रवास इथंवर थांबत नाही तर कधी तो प्रेमिकेच्या ओंजळीत सुगंध करतो तर कधी हळूच आपल्या जीवन संगीतकार संगीनी करता लपवून खिशात आणलेला गजरा जेव्हा तिचा कांत तिच्या केसात माळतो त्या क्षणी स्टेटसवर साथीदाराचा फोटो दाखवण्यापेक्षा ही जास्त जे प्रेम खुलते ते प्रेम खुलवणारा गजरा कधी देव्हार्‍यात… कधी स्वामींच्या चरणी… तर कधी एखाद्या सुफी संतांच्या कबरीवर… प्रत्येकाचं रुप वेगळं श्रद्धा वेगळी गजरा हा भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक सध्या विभागला गेला आहे पूर्वीच्या लोप पावत चाललेल्या संस्कृतीमधील हा देखील भाग पूर्वीच्या काळी गजरा म्हणजे स्त्री शृंगारातील एक शृंगार असंच काहीसं होतं
कारण बायकांचे सौंदर्य या गजऱ्यामुळे आणखीनच उठून दिसायचं लग्न समारंभात तर जिथे नजर पडेल तिथे गजरा काय ते गजरेच गजरे याला एखादा अपवाद घटकच वापरतो असं नाही काही अपवाद असतो मात्र गजरा हा प्रत्येक स्त्रीचा आवडता मला आठवतंय माझ्या लहानपणी प्रत्येक लग्नाच्या मांडवात आईस्क्रीमवाल्या बरोबरच गजरेवाला सुद्धा तिथं हमखास रेंगाळायचा… वावरायचा…कारण रोजच्यापेक्षा त्याचा तिथे जास्त गजरा विकला जायचा मी शाळेत असताना समोरच्या बंगल्यातली बाई बागेतलं एकदा तरी फुल केसात माळायची झाडाला म्हणावं एवढी जास्त काही फुलं नाहीत आणि वेणीच्या प्रत्येक वळणावर एक फुल रोवायची मस्त दिसायचे ते दृश्य मस्त दिसायचं ते गजऱ्यासारखं किंवा त्यापेक्षाही कमी फुलात आनंद डबल मिळायचा यात तिची मॅनेजमेंट पण दिसायची कमी असलं तरी त्याला सजवता येतं आणि ते खूप सुंदर दिसतं आमची आई दोन-तीन फुलं सेफ्टी पिन मध्ये गुंतवून वेणीची शोभा वाढवायची…..
############################
प्रस्तुती….. किरण बेंद्रे
पुणे
7218439002

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

11 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

12 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

4 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

4 days ago