.
चिखलठाण ता करमाळा येथील इरा पब्लिक स्कूलचा बाजार दिवस उपक्रमात चार तासात एक लाख 38 हजारांची झाली उलाढाल
आज इरा पब्लिक स्कूल , चिखलठाण येथे बाजार दिनाचे आयोजन करण्यात आले होते याचे उदघाटन सरपंच चंद्रकांत सरडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे , जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड ,प्रगतशील शेतकरी आदीनाथ कारखान्याचे संचालक मा. धुळाभाऊ कोकरे . प्रशांत नाईकनवरे , गजेंद्र पोळ, अध्यक्ष डॉ ब्रिजेश बारकुंड व सर्व पालक उपस्थित होते. या बाजारात भाजीपाला ,फळे ,स्टेशनरी , खाऊगल्ली , गृहपयोगी वस्तूंचे विविध स्टॉल्स उपलब्ध होते. लहान बालगोपाळांचा हा आगळावेगळा बाजार पाहून उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आपल्या सामानांची विक्री केली. विद्यार्थ्यांच्या चढा ओढी आवाजाने संपूर्ण बाजार दुमदुमला. आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी चढा ओढ लागली होती.
या बाजारात चिखलठाण कुगाव ,टोपेबाबा ,केडगाव ,शेटफळ ,जेऊर व परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणबरोबरच व्यवहार ज्ञान वाढावे. तसेच आपल्या शेतीमध्ये धान्य विकण्याची कला विकसित झाली पाहिजे आणि मुलांचा आत्तापासूनच व्यवसायिक दृष्टिकोन वाढीस लागला पाहिजे या उद्दात्त हेतूने बाजार दिवसाचे आयोजन करण्यात आलेले होते या बाजारात विद्यार्थ्यांनी तब्बल 138000/- हजारांची उलाढाल केली हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जी.एस.कसबे यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी ,पालक, शिक्षकेतर कर्मचारी व स्कूल बसचालक यांनी परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…