करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांच्या मालकीचा असल्याने हा कारखाना वाचवुन सर्वतोपरी सहकार्य करुन कारखान्याला गतवैभव मिळवुन देऊ असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या गळीत हंगामाचा शुंभारंभ रविवार २५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकुन करण्यात आला. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी योजनेसह सर्व महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावू , तसेच आदिनाथ कारखान्यासाठी जसे तुम्ही एकत्र आले आहात, तसे तुम्ही भविष्यातही एकत्र रहा तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिनाथ कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी दिले.
याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, आमदार राम शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, बागल गटाच्या नेत्या आदिनाथ कारखान्याच्या संचालिका रश्मी बागल-कोलते, माजी आमदार नारायण पाटील, आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे, उपाध्यक्ष रमेश कांबळे, मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक एच.बी.डांगे, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक किरण सावंत,आदिनाथचे संचालक नानासाहेब लोकरे, दिलीप केकान,अविनाश वळेकर,पांडुंरंग जाधव, डॉ.हरिदास केवारे, आदिनाथचे माजी अध्यक्ष संतोष पाटील, जाधव,लक्ष्मण गोडगे,सचिन पांढरे,पोपट सरडे,नामदेव भोगे,चंद्रहास निमगिरे,नितीन जगदाळे,सौ.स्मिता पवार, आ, माजी आमदार नारायण पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, बिभीषण आवटे, तानाजी झोळ, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले,माजी सभापती शेखर गाडे, गहिनीनाथ ननवरे, अतुल पाटील, अजित तळेकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख देवानंद बागल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, आदिनाथचे कार्यकारी संचालक अरुण बागनवर , रामदास झोळ, दत्ता जाधव, केरु गव्हाणे, उदयसिन्ह मोरे-पाटील, अतुल खूपसे-पाटील, आदिनाथ कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हटले कि, आदिनाथ कारखाना सुरु करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी संपूर्ण माहिती सांगितली होती, त्यानुसार हा कारखाना सुरू करण्यासाठी आपण मदत करू असे त्यांना सांगितले, त्यानंतर तानाजी सावंत यांनी कारखाना सुरू करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या, त्यानुसार कारखाना इकडे तिकडे न जाता सभासदांच्या मालकीचा राहिला, पाटील-बागल जसे कारखान्यासाठी एकत्र आले तसे भविष्यातही एकत्र रहा तुम्हाला सर्वतोपरि सहकार्य केले जाईल. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मंत्रीमंडळ बैठकीत रखडलेल्या सिंचन योजनांना सुधारित मान्यता देऊन कामांना गती देण्याचा या सरकारने प्रयत्न केला असून त्यातून जवळपास 2 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबतही जलसंधारण विभागाची तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल. राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असून, राज्यात 14 लाख 87 हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार काम करत असून शेतकरी, कष्टकरी, वारकरी, असंघटित कामगार असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी व्हावा, अशी सरकारची भूमिका आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे, त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. करमाळा तालुक्यातील विकासाचे प्रकल्प पूर्ण केले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
उपस्थित शेतकऱ्यांनी लाईट बिलाचे बोला असे म्हटल्यानंतर श्री.शिंदे यांनी त्यावर कनेक्शन कट करायचे बंद केले आहे, तेवढे चालू बिल भरा असे आवाहन शेतकऱ्यांना केले. यावेळी नारायण पाटील यांच्या गटाच्या २१ ग्रामपंचायतिच्या सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमची सर्व कामे केली जातील असे सांगितले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना चे महेश चिवटे, भाजपचे गणेश चिवटे व जगदीश आगरवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व माजी आमदार नारायण पाटील यांनी विविध मागण्याचे निवेदन देवून आपल्या भाषणादरम्यान करमाळा तालुक्यातील विविध प्रश्न मांडले.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी केले. या कार्यक्रमात माजी आमदार नारायण पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच देवानंद बागल, रमेश कांबळे, केरु गव्हाणे, सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांची भाषणे झाली.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी अनंत अडचणीवर मात करुन संकटावर यशस्वी मात करुन अथक परिश्रम घेऊन नेतृत्व सिध्द केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन धनंजय डोंगरे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर व ऐश्वर्या हिबारे यांनी केले.