करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामधे काही दिवसापूर्वी लावंड व ढाणे यांच्यातील तरुणांमधे किरकोळ कारणांमुळे गैरसमजातून वाद झाला होता . या वादाचे रूपांतर आपापसात हाणामारी व एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत झाले होते . करमाळा शहर व तालुक्यात स्वातंत्र्योत्तर काळानंतर देशभक्त माजी आमदार नामदेवराव जगताप व कर्मवीर आण्णासाहेब जगताप यांनी या तालुक्यातील सामाजीक वातावरण लोकशाही मार्गाने स्वातंत्र्य व आपापसात सौहार्दपूर्ण, जातिभेद विरहीत , दहशत व भयमुक्त ठेवत आपली सार्वजनिक जीवनातील वाटचाल ठेवली होती . याच संपन्न व उदात्त विचार सरणीनुसार माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आपली सामाजीक व राजकीय वाटचाल ठेवली आहे . ज्याप्रसंगी आपापसातील गैरसमजामुळे लावंड व ढाणे यांचेत वाद होवून गुन्हे दाखल झाले . या घटनेचे माजी आमदार जगताप यांना शल्य होते .आपल्या शहरात येणार्या भावी पिढीच्या डोक्यात एकमेकाबद्दल अशा प्रकारचे किल्मिष व वादविवाद होणे शहराच्या सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य नाही व हा वाद माजी आमदार जगताप यांच्याच शब्दाचा मान राखत मिटू शकतो व त्या कामी श्री जगताप यांनी पुढाकार घ्यावा अशी साद दोन्ही गटातील काही समंजस व्यक्तिंनी घातली . त्यानुसार माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधाकर लावंड, रामभाऊ ढाणे, दादासाहेब इंदलकर, रमेश वीर, अमोल परदेशी, सुनील ढाणे , घरबुडवे, विठ्ठल क्षिरसागर, जोतीराम ढाणे,सतीश फंड, प्रमोद पोळ यांचेसह लावंड व ढाणे समर्थक सर्व युवक माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे निवासस्थानी एकत्रित जमले . यावेळी माजी आमदार जगताप यांनी सर्वांना एकत्रितपणे गुण्यागोविंदाने व आनंदाने राहण्याचे आवाहन करीत गैरसमजातून झालेल्या वादाला तिलांजली देत युवकांनी शिक्षण , उद्योग, व्यवसाय ,भावी करीअर व संभाव्य जबाबदारीकडे लक्ष केंद्रीत करणेबाबत जागृती केली . श्री . जगताप यांचे आवाहनाला मान देत दोन्ही बाजूच्या युवकांनी एकमेकाला पेढा भरवित – गळाभेट घेत सर्व वाद संपुष्टात आणल्याचे सांगीतले . हा वाद मिटविण्यात अत्यंत महत्वपूर्ण भुमिका पार पाडल्यामुळे माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचा लावंड व ढाणे ग्रुपच्या वतीने सुधाकर लावंड, रामा ढाणे यांनी यथोचित सत्कार केला . माजी आमदार जगताप यांनी घेतलेल्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे .