पोमलवाडी गावचा विकास हे ध्येय समोर ठेऊनच मी निवडणुक लढलो आणि जिंकलोही- नुतन सरपंच नवनाथ गायकवाड

करमाळा प्रतिनिधी- पोमलवाडी ता- करमाळा च्या सरपंच पदी आमदार. संजयमामा शिंदे समर्थक आणि पश्चिम भागाचे नेते सुर्यकांत( भाऊ) पाटील यांचे पॅनलचे श्री. नवनाथ मल्हारी गायकवाड यांची निवड झाली असुन, त्यांचे शिक्षण बी.कॉम पर्यंत झालेले आहे. त्यामुळे पोमलवाडी गावाला एक शांत, संयमी आणि सुशिक्षित पदवीधर चेहरा सरपंच म्हणुन मिळाला आहे. करमाळा तालुक्यातुन झालेल्या ३० गावांचे ग्रामपचायतीत अनेक सुशिक्षित- पदवीधर चेहरे सरपंच- सदस्य पदावर विराजमान झालेचे दिसुन येते. याबाबत आम्ही पोमलवाडीचे नुतन सरपंच श्री. नवनाथ गायकवाड यांचेशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की.. आमचे येथील सरपंच पद ओबीसी प्रवर्ग करीता होते, मला गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी निवडणुक लढविण्याचा आग्रह केला, आमचे गावातील माजी सरपंच संग्राम पाटील, उमेश आरडे, माजी उपसरपंच हनुमंत भोपते, पोपट फाळके, माजी सरपंच बाबासाहेब काळे, तसेच काळे,फाळके,मगर,देवकर, भोपते,घोरपडे, फरताडे, ढवाण, देवकर, चव्हाण, घाडगे, सस्ते, कदम, हुलगे, भाकरे, गायकवाड, नवले, पिसाळ,उगले,आरडे, आरणे,शेख,लोखंडे,बाबर,शेलार, काटकर,गुंड,खरात,जाधव, साळवे, बागल,काटकर,खरात, पाटील परिवारातील सदस्यांनी दिलेल्या बहुमोल मतांचे सहकार्याने मी सरळमार्गाने कोणतेही अमिष, पैसा न देता निवडुन आलो आहे. माझ्या गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सर्व तरुणांच्या साथीने मला विकासात्मक वाटचाल करायची आहे.. गावातील माजी सरपंच संग्राम पाटील आणि तरुणांनी मागिल काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य दिव्य पुतळा आणि शेजारी गार्डन करून गाव सुशोभित केलेले आहे. प्राथमिक शाळेला वेळोवेळी मदत व प्रोत्साहन दिलेले असुन कॉम्प्युटर लॅब, सायन्स हॉल आणि प्रयोगशाळा, बनविली आहे, सीसी टीव्ही, पाण्यासाठी ऑरो फिल्टर संच, पथदिवे, रस्ते, गटार, पोमाई मंदिराचे सुशोभिकरण, व्यायामशाळा, हॉलीबॉल ग्राऊंड, तयार केलेले आहे. आमचे मार्गदर्शक सुर्यकांत( भाऊ) पाटील यांनी जिद्दीने पोमलवाडी- केत्तुर-२ ला जोडणारा पुल निर्माण करणेसाठी घेतलेले कष्ट, लोकवर्गणीतुन माझ्या गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग मी पाहीला आहे.. शासनाचा निधी मंजुर होण्याचे आधी माझ्या गावातील प्रत्येक माणुस पुलाचे, रस्त्याचे कामासाठी रात्रंदिवस झटताना मी पाहीलेला आहे.. त्यामुळे पोमलवाडी गावाचा चेहरामोहरा बदलताना आपणही जबाबदारी स्विकारून गावाचे विकासात भर घालण्याचे स्वप्न ऊराशी बाळगलेले आहे. राजकारण करताना विरोध- टिका ही आलीच, काहींनी चुकीचा प्रचार करणेचाही प्रयत्न केला परंतु आम्ही आमचे नेते सुर्यकांत भाऊ आणि सर्वांचे सहकार्याने अतिशय शांततेने आणि संयमाने ही निवडणुक लढवली आणि जिंकली असलेबाबत नुतन सरपंच गायकवाड यांनी सांगितले.. भविष्यात आमदार. संजयमामा शिंदे यांचे सहकार्याने गावाचे विकासात्मक वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असलेचे त्यांनी सांगितले. गावात तंटामुक्ती समिती, पोलिस मित्र संघटना, युवक मंडळे, बचत गट यांना प्रोत्साहन देणार असुन,गावात दारूबंदी व्हावी यासाठी प्रयन्तशील राहणार आहे. तसेच श्री. पोमाई देवीचे मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवुन श्री. पोमाई देवीची महती प्रसिद्धीस आणणार आहे. या आणि अशा सर्व संकल्पांसाठी सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन देखिल त्यांनी या निमित्ताने केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

21 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago