* नाव अशोक निव्रुत्तीराव गुंजाळ. वय ७२
* वीस वर्षं हाँटेलबाँय म्हणून काम केले.
* शिक्षण – बी.ए. एफ.वाय.
* आंतरजातीय विवाह.
* दोनच मुलींवर कुटूंबं नियोजन.
पूजा , सपना .
* तुरूंगवास *
आणिबाणी विरोधात गेल्यामूळे नाशिकरोड जेलमधे १९ महिने तुरूंगवास.
* मराठवाडा विद्यापिठाला डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे यासाठी १५ दिवस तुरूंगवास.
* अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठीच्या आंदोलनात आठ दिवस तुरूंगवास.
* आंदोलने *
* हमाल-मापाडी, सायकलरिक्शा, गुमास्ता, हाँटेलबाँईज युनियन यांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन.
* बसडेपो.
* मेडीकल काँलेज.
* अंबाजोगाई जिल्हा निर्मिती.
* अकरा भ्रष्ट शासकीय अधिकार्यांना जोड्याने मारहाणीचे अकरा गुन्हे दाखल.
तडीपारीसारख्या कारवाईलाही सामोरे जावे लागले.
* पत्रकारिता *
* शोधपत्रकारिता.
* भागुरामजी सातपूते यांच्या माध्यमातून केज मतदारसंघावर २५ वर्षे अधिराज्य गाजवणार्या बाबूराव आडसकर व भगवानराव लोमटे यांच्या राजकीय अस्तित्वाला एका व्यंगचित्रामूळे सुरूंग लावण्यात सांजपाखरू चा वाटा.
* रेणापूर मतदारसंघातून गोपीनाथराव मुंडे यांचा पंडीतराव दौंड यांच्या माध्यमातून पराभवात सांजपाखरू चा पुढाकार.
* संबुळ ढूमढूम वाजतो,
पालकमंत्री नाचतो.
सांजपाखरूच्या या एका अंकाने पंडीतराव दौंड यांचे मंत्रीपद घालवले.
* भगवानराव लोमटेंची नगर पालिकेवरची चाळीस वर्षांची सत्ता संपूष्टात.
* सांजपाखरूच्या माध्यमाने नवीन पिढी राजकारणात आली.
* प्रस्थापितांशी कायम वैर.
* पोलीस व भ्रष्ट अधिकार्यांवर वचक.
तीन पोलीस अधिकारी आणि वीस विविध विभागातील भ्रष्ट अधिकार्यांना घरचा रस्ता दाखवला.
* १९७२ च्या दुष्काळात बारा किलो धान्य द्या या मागणीसाठी निघालेल्या मोर्चात सक्रिय सहभाग.
* मोंढ्यातील हमाल- मापाड्यांसाठी
हमाल – मापाडी कायदा लागू करण्यात यशस्वी.
डॉ. बाबा आढावांची शाबासकी.
* बीडच्या दैनिक बिंदूसरा मधून पत्रकारितेची सुरवात.
दै.प्रजावाणी, दै.मराठवाडा, दै.अजिंठा, दै.शिवशक्ती या व्रत्तपत्रांचे वार्ताहर म्हणून काम केले.
* १९८१ पासून एस.टी.स्टँडसमोरील चौकात बोंबाबोंब हस्तलिखित सुरू. त्यानंतर सांजपाखरू हे टायटल मिळाले.
* १९८३ साली सांजपाखरुच्या प्रकाशनाला डॉ. बापूसाहेब काळदाते व ना.ग.गोरे यांची उपस्थिती.
* शरद यादव, शांती पटेल,जाँर्ज फर्नांडीस, डॉ. बापूसाहेब काळदाते, यदुनाथजी थत्ते, डॉ. नंदकुमार देव, किशोर पवार या समाजवाद्यांसोबत प्रदिर्घ काळ राहण्याचा योग आला.
* माजी प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्याशी बेकार युवकांना बिना जमानत कर्ज मिळवून देण्यासाठी चर्चा.
* स्व.ईंदिराजी गांधी यांची भेट.
* राष्ट्र सेवा दलाचा पूर्णवेळ सेवक म्हणून दोन वर्षे दिले.
* कोपरगाव साखर कारखान्यातील साखर कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन वर्षे वेळ दिला.
* अंबाजोगाई शहरात पहिल्यांदाच दहा वर्षं सामूहिक विवाहाचे आयोजन.
* एक गाव एक मंडप ही योजना मराठवाड्यात राबवली.औरंगाबाद वगळता सर्व जिल्ह्यात योजना राबवली.
* आर्थिक, सामाजिकद्रुष्ट्या कमकुवत कुणबी समाजाचे मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात संगठन बांधले.
* स्वतःला मराठा म्हणवून घेणार्यातून कुणबी समाज वेगळा केला. म्हणून आज कुणबी समाज स्वतःला कुणबी म्हणवून घेतो.
* शासन दरबारी कुणबी मराठा /मराठा कुणबी समाजाला ईतर मागासवर्गीयांमधे क्र.८३ वर मान्यता देत शासनाने G.R. काढला. हेच कुणबी समाज संघटनेचे यश आहे. कुणबी विकास मंचच्या माध्यमातून लावले गेलेल्या सामूहिक विवाहातून व मा.गोपीनाथराव मुंडे यांनी शासनाकडून साडेसहा लाख रूपयांची देणगी कुणबी विकास मंचला दिली. त्या पैशातून मुकूंदराज रोडवर दर्शनी भागात एक एकर जमीन खरेदी केली आहे. जीथे कुणबी मंगल कार्यालय उभारण्याचा आमचा मानस आहे.
– अशोक गुंजाळ.
संपादक, सांजपाखरु.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…