करमाळा तालुक्यातील केळीचे भरघोस व दर्जेदार उत्पादन पाहता तालुक्यात केळी च्या साठवणूकीच्या बरोबरच केळी संशोधन प्रकल्प निर्मितीची गरज- प्रा.शिवाजीराव बंडगर

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केळीचे भरघोस व दर्जेदार उत्पादन पाहता तालुक्यात केळी च्या साठवणूकीच्या बरोबरच केळी संशोधन प्रकल्प निर्मितीची गरज असल्याचे प्रतिपादन करमाळा क्रषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा शिवाजी बंडगर यांनी कंदर येथे बोलताना केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य क्रषि पणन मंडळ,पुणे चे सरव्यवस्थापक राजेंद्र महाजन होते.

काल कंदर ता. करमाळा येथे साईकृपा मंगल कार्यालयात राज्य पणन मंडळ,पुणे,कृषि विभाग
महाराष्ट्र राज्य, व कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा च्या संयुक्त विद्यामाने केळी निर्यात विषयक क्षमता वृध्दीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बंडगर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजी राव देशमुख, उपविभागीय क्रषि अधिकारी रविंद्र कांबळे, आदिनाथचे माजी संचालक नवनाथ शिंदे,दिपकआबा देशमुख, बाजार समिती चे संचालक दादा मोरे,आदिनाथचे संचालक भागवत पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना बंडगर म्हणाले की, करमाळा तालुक्यात केळी साठी आवश्यक असलेले हवामान असून जळगाव पेक्षा ही अधिक व दर्जेदार उत्पन्न इथे होत आहे . त्यामुळे आपली स्पर्धा आता जळगाव शी नसून अमेरिके सारख्या देशात केळी निर्यात करण्यार्या देशाशी आहे .त्यामुळे तालुक्यात केळी ची साठवणूक करण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर व्हायला हवी . तसेच निर्यात क्षम केळी उत्पादीत होण्यासाठी केळी संशोधन प्रकल्प उभारणे आवश्यक आहे.

तालुका क्रषी अधिकारी संजय वाकडे म्हणाले ,उजनी जलाशय काठावरील गावाबरोबरच दहिगाव उपसा सिंचन योजनेमुळे पाणी पोहोचलेल्या वरकटणे, सोंदे,गुळसडी आदी गावातही केळी उत्पादक शेतकरी वाढत असून शेतकर्यांची फसवणूक होवू नये म्हणून अधिक कार्यक्षम यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. तालुका क्रषी विभाग शेतकर्याला वेळोवेळी मदत करायला तयार आहे . शेतकर्यानी या प्रशिक्षणातून अधिक लाभ घ्यावा.

प्रास्ताविक पणन मंडळाचे अनंत सावरकर यानी केले . स्वागत करमाळा बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर , पणन मंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक दयानंद देशमुख यांनी केले.यावेळी दिसभरात सौ काजल म्हात्रे यांचं मातीचे आरोग्य व व्यवस्थापन, प्रा एन बी शेख यांचं आधुनिक केळी उत्पादन व सुगीपश्चात हाताळणी ,अभिजित पाटील यांचं लाल केळी उत्पादन ,किरण डोके यांचं निर्यातदाराचे मनोगत, सचिन वाळुंज यांचं केळी विपणन या विषयावर तर उत्पादन समस्या निराकरण या विषयावर यांचं मार्गदर्शन झाले .या कार्यक्रमात सेंद्रिय शेती करणारे वांगी नं 1येथील शेतकरी हनुमंत यादव ,वांगी चे माजी सरपंच विठ्ठल शेळके, नगरपालिका माजी मुख्याधिकारी जगताप, सोमनाथ हुलगे, अनिल काळे, आदिनाथचे माजी संचालक नवनाथ भांगे,प्रगतीशील बागायतदार अॅड जालिंदर बसळे, वाय जी भोसले यानी सहभाग घेत प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले .यावेळी तीनशे शेतकर्यानी प्रशिक्षणाबरोबरच सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. आभार पणन मंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक दयानंद देशमुख यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

11 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

13 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago