करमाळा प्रतिनिधी अंनत अडचणीचा डोंगर पार करुन आदिनाथचा गड राखुन जनतेचा नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवणारे चेअरमन धनंजय डोंगरे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना तीन वर्षापासून बंद अवस्थेत होता अशा परिस्थितीमध्ये कारखाना परत चालू होईल का नाही याबाबत बरेच तर्क विर्तक चालु होते. साखर न विकल्यामुळे आर्थिक अडचणीमुळे कारखाना जप्तीची कारवाई करण्यात येणार होती अशा परिस्थितीमध्ये आदिनाथ कारखाना वाचावा यासाठी कारखाना चालू करण्यासाठी आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रोला देण्याचे ठरले दिल्यानंतरही त्यांनी कारखाना चालू केला नाही नुसता करार करून आश्वासन देऊन हा कारखाना चालू करण्याचा खोटा आशावाद दाखवला .बागल गटाला तर याचा फार मोठा त्याचा सहन करावा लागला. विधानसभेला फार मोठा फटका बसला.काही झाले तरी शेतकऱ्यांचा कारखाना वाचला पाहिजे ही भावना उराशी बाळगली कारखाना चालू करण्याची आशा दाखवून पवारांनी कारखाना चालू करण्याचा खोटा आशावाद दाखवून कारखाना बंद अवस्थेत ठेवला होता याचा फार मोठा तोटा बागल गटाला सहन करावा लागला अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये अनंत अडचणीचा डोंगर समोर उभा असताना न्यायालयीन प्रक्रियेतून कारखाना आपल्या ताब्यात घेण्यासाठी चेअरमन धनंजय डोंगरे यांनी आपल्या नेत्या रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल बागल गटाचे सर्व संचालक यांच्या सहकार्याने तसेच पाटील नेते मा आमदार नारायण आबा पाटील सर्व संचालक यांना विश्वासात त्यांच्या सहकार्याने बंद पडलेल्या कारखान्याचा लढा यशस्वीपणे लढून नेत्यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. लहरो से डरकर नका पार नही होती कोशिश करने वाले को कभी हार नही होती या व्यक्तीप्रमाणे धनंजय डोंगरे यांनी अनंत अडचणीचा डोंगर पार करून आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले असून मुख्यमंत्र्यांचे हस्ते न भूतो न भविष्यती असा सत्कार संपन्न झाला आहे. सहकार क्षेत्रामध्ये काम करून कामगार शेतकरी सभासद यांचा विश्वास जिंकून यशस्वी नेतृत्व दाखवल्याबद्दल धनंजय डोंगरे यांचे कार्य नक्कीच राजकारणातील मंडळींना प्रेरणादायी आहे.