पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत दि.२/१/२०२३ ते १४/१/२०२३ या कालावधीमध्ये भरविण्यात येणारी राजे जन्मंजय भोसले आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा-२०२२-२३ आयोजित करण्यासाठी यजमान महाविद्यालय म्हणून या वेळी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सज्ज झाले आहे.
मानाच्या आणि चुरशीच्या या स्पर्धेसाठी पु. अ. हो. सो. वि. सोलपूर कार्यक्षेत्रातील २८ महाविद्यालयांचे संघ उतरले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव पाटील आणि कीडा संचालक डॉ. अनुल लकडे यांनी दिली.४४८ खेळाडू मुले आणि २८ संघ व्यवस्थापक मिळून ४७६ जणांच्या निवास आणि क्रीडांगण व्यवस्थेसंदर्भात विद्या विकास मंडळाचे सचिव श्री. विलासराव घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी कष्ट घेत आहेत.
प्रस्तुत स्पर्धांसाठी महाविद्यालयाच्या क्रीडांगणा बरोबरच करमाळा येथील तालुका क्रीडा संकुलाचे मैदान सर्व सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे.
नॉक आऊट म्हणजे बाद पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेची पहिली फेरी दि.२,३ व ४ रोजी ट्वेंटी- ट्वेंटी फॉरमॅटनुसार होणार असून उर्वरीत सर्व सामने पन्नास षटकांचे होतील.
या स्पर्धेच्या शेवटी विद्यापीठ संघासाठी खेळाडू निवडले जाणार असून मुलींची निवडही याच दरम्यान विद्यापीठाने नियुक्त केलेल्या निवड समितीकडून होणार आहे. तसेच या स्पर्धेतून निवडण्यात येणारा मुलांचा संघ राजस्थान येथील पी. डी. यू. शेखावत युनिव्हर्सिटीमध्ये भरविण्यात येणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणार आहे.
सदर क्रिकेट स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, नॅक कोऑर्डिनेटर प्रा. अभिमन्यू माने, प्रा डॉ. विजय बिले,कनिष्ठ विभागाचे क्रीडा संचालक प्रा. राम काळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद शेटे, विद्या विकास मंडळाचे सहसचिव श्री. विक्रम सूर्यवंशी आणि प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. महादेव वाघमारे प्रभृति विशेष परिश्रम घेत आहेत.
तरी सदर क्रिकेट स्पर्धेसाठी करमाळा तालुक्यातील व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कार्यक्षेत्रातील क्रिकेटप्रेमींनी स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन विद्या विकास मंडळाचे सचिव श्री. विलासराव घुमरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…