Categories: करमाळा

कर्जत करमाळा तालुक्यातील छायाचित्रकारांना अद्यावत राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान अद्यावत ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी केकेआर फोटोग्राफर युनियनच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार- महेंद्र मांडगे


करमाळा प्रतिनिधी जाहिरात, पत्रकारिता, मॉडेलिंग, प्री-वेडिंग,वेडिंग फोटोग्राफीची खूप मोठे विस्तारित असे क्षेत्र आहे. कर्जत व करमाळा तालुक्यातील छायाचित्रकारांनी अद्यावत राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व अद्यावत ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी केकेआर फोटोग्राफर युनियनच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे महेंद्र मांडगे यांनी सांगितले. कर्जत मध्ये केकेआर फोटोग्राफर युनियन व पारस इलेक्ट्रॉनिक अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय कार्यशाळा व ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कर्जत, करमाळा,मिरजगाव, महिजळगाव व राशीन परिसरातील सर्व छायाचित्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
” जशी दृष्टी तशी सृष्टी” असे म्हटले जाते, एक चांगले छायाचित्र दहा निबंधांचे वर्णन करू शकते. एवढे सामर्थ्य त्या छायाचित्रांमध्ये असते,फोटोग्राफी ही एक अशी कला आहे कि यामध्ये उज्वल करिअर निर्माण करण्याची संधी उपलब्ध आहे. सागर डाळींबे, प्रवीण बोरकर,महेंद्र मांडगे,भाऊसाहेब गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. पारस इलेक्ट्रॉनिक्स अहमदनगर यांच्या सहकार्याने कॅनॉन,पॅनासोनीक, डीजीआय आदी कंपनीच्या नवनवीन कॅमेऱ्याची माहिती व मार्गदर्शन छायाचित्रकारांना करण्यात आले.
वैभव खळे यांनी अद्यावत फोटोशॉप प्रणालीची माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले. तुकाराम सायकर, शिरीष यादव, आकाश बिडगर यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी विवेक कोकमठाणकर, रुपेश कनोजिया, दीपक गोरडे, धीरज जमदाडे, प्रमोद मोहिते, विनीत सिंग,सिद्धार्थ डावरे, संपत नेवसे, सुमित भैलुमे,माऊली जाधव, अक्षय फरताडे, दत्ता ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश तेलंग यांनी आभार व्यक्त केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago