प्रतिनिधी बाभुळगाव ते कुंभेज फाटा या रस्त्याचे काम गेली अनेक वर्षापासुन केंद्रीय रस्ते वाहतुक निधी तुन चालु असुन, सदरचे काम मांजरगाव ते उमरड दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी अडविलेले होते.. सदर शेतकरी वर्गाची भुसंपादनाची रक्कम मिळाली नसल्या बाबतची तक्रार होती.. याबाबत त्यांनी संबधित खात्याचे अधिकारी यांना वारंवार सुचना विनंती केली परंतु त्यांची दखल कोणीही घेतली नाही, *याबाबत आमदार. संजयमामा शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम चालु करावे व स्थानिक शेतकऱ्यांचे मागणीचाही विचार व्हावा म्हणुन वरिष्ठ अधिकारी वर्गाची मिटींगही लावली.*. परंतु येथील स्थानिक शेतकरी मे. कोर्टात गेले.. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच, रस्त्याची झालेली खराब स्थिती, खराब रस्त्यामुळे नागरिकांना होणारा त्रासआणि मागणी याचा विचार करून आमदार. संजयमामा शिंदे यांनी मांजरगाव, उमरड येथील शेतकर्यांशी संवाद साधुन सदरचे काम चालु करणेस सांगितले तसेच आपल्या संबधित शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी म्हणुन त्यांचे पाठीशी राहणार असलेचे आश्वासन दिले असुन, सदर ठिकाणचे रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे.या बाबत आमदार संजयमामा शिंदे यांचे विनंतीला मान देऊन या ठिकाणचा अडथळा दूर होऊन काम चालु झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सदर कामाचा अडथळा दुर करून माणुसकीचे दर्शन दाखविणारे श्री. श्रीनिवास रामेश्वर पाटील, श्रीरंग केरू चौधरी, डॉ. सुनील हरिदास चौधरी यांची आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रस्त्याचे काम झाले तरी संबधित शेतकर्याना त्यांचा मोबदला मिळावा म्हणुन कायदेशीर मदत देणार असले बाबतची माहिती ॲॅड. अजित विघ्ने यांनी दिली.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…