करमाळा प्रतिनिधी: येथील सुरताल संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘रजत जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता विकी मंगल कार्यालय करमाळा येथे संपन्न होणार आहे.
यावेळी ‘रजत जयंती’ कार्यक्रमात डॉ.आम्रपाली त्रिवेदी: दिल्ली गायन, डॉ. मनीषा देवी गोस्वामी: गुवाहटी (आसाम) भरतनाट्यम, गुरु स्वप्नाली गोस्वामी: गुवाहटी (आसाम) सत्रिय नृत्य, डॉ. पंकज नामसूद्रा: गुवाहाटी (आसाम) सत्रिय नृत्य, ज्योतिर्मयी मोहंती: भुवनेश्वर (ओरिसा) ओडिसी नृत्य इत्यादी नामवंत कलाकार आपली कला प्रस्तुत करणार आहेत. त्याचबरोबर विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी आपले गायन- वादन सादरीकरण करणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे व यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांना ‘संगीत रसिक’ पुरस्कार तसेच संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व योगदान देणाऱ्या कलाकारांना ‘सुर सरस्वती’ पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
प्राचार्य बाळासाहेब नरारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून करमाळा तालुक्याला संगीत कलेचा वारसा मिळाला आहे. विद्यालयाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी विशारद झाले आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाची करमाळाकरांना आनंदाची अनुभूती घेता येत आहे. गुरुपौर्णिमा, पलुस्कर पुण्यतिथी, बोळंगे गुरुजीं पुण्यतिथी, दिवाळी पहाट, श्रावणसरी, वार्षिक स्नेहसंमेलन इत्यादी अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने घेतले जातात.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या संगीत व नृत्य कलेचा आनंद घेण्यासाठी संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…