Categories: करमाळा

जगताप गटावर प्रेम करणारी जनता हिच जगताप गटाची खरी ताकद- मा.आ.जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी जगताप गटावर प्रेम करणारी जनता हिच जगताप गटाची खरी ताकद असुन जगताप गटाने नेहमीच विकासाचे तत्वाचे राजकारण केल्याने सर्वसामान्य जनता जगताप गटाच्या पाठीशी असल्याचे मत जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव भाऊ जगताप यांनी व्यक्त केले. नवीन वर्षाच्यानिम्मिताने नागरिकांशी सुसंवाद शुभेच्छा देण्यासाठी करमाळा शहरातील जगताप गटाचा बालेकिल्ला तसेच जन्मभुमी,कसाबगल्ली,सुतारगल्लीका नागराज चौक,कसाबगल्ली येथील नागरिकांच्या कार्यकर्त्याच्या संवाद बैठक झनकसिंह परदेशी यांच्या क्वाॅलिटी साॅमिल येथे आयोजीत करण्यात आली होती. करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे जन्मस्थान व निवासस्थान करमाळा शहरातील सुतार गल्ली येथील नववर्षाचे औचित्य साधत श्री .जगताप यांनी झनकसिंग परदेशी यांच्या मिलमधे सर्व नागरीकांशी संवाद साधत त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी सुतार गल्ली, फंड गल्ली , कुरेशी गल्ली येथील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते .याप्रसंगी त्यांनी सर्व जुन्या सवंगड्या सह तरुण सहकार्‍यांची आस्थेवाईकपणे विचारपुस केली . कै नामदेवराव जगताप, कै आण्णासाहेब जगताप, कै सरदारसिंग नाईक, कै रतनसिंग नाईक , कै धोंडनसिंग परदेशी यांच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला व रुणानुबंध पिढ्यान पिढ्या असेच वृद्धींगत होणार असल्याचे सांगीतले . यावेळी नगराध्यक्ष वैभव जगताप, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, नगरसेवक श्रेणिक खाटेर, ॲड नवनाथ राखुंडे, माजी नगराध्यक्ष हनुमंत फंड,माजी नगरसेवक डॉ श्रीराम परदेशी,अजितसिंग परदेशी, ज्ञानदेव फंड, नजीर अहमद शेख, दिगांबर रासकर,आस्लम वस्ताद शेख, सतीश फंड,रमेश वीर, नानासाहेब मोरे,बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, खाजाहुसेन कुरेशी, डॉ जयंत कापडी, ईश्वरसिंग परदेशी,शंकर हवालदार, धोंडीराम माने, प्रविण कुटे, रामचंद्र क्षीरसागर, प्रमोद पोळ, रघुनाथ क्षीरसागर, सचिन शेळके, नितीन दळवे, अनिल माने, आसिफ पठाण, रविंद्र सपकाळ यांचेसह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत अमृतसिंग परदेशी यांनी केले . याप्रसंगी श्रेणिकशेठ खाटेर, दिनेश मडके यांनी आपले विचार व्यक्त केले . आभार भुषणसिंग परदेशी यांनी मानले .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

1 day ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

1 day ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

1 day ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago