राजे रावरंभा शेतकरी प्रोडयुसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्या वरकटने येथे उद्घघाटन

प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्या दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता वरकटणने येथे उद्घाटन होत असून यासाठी उद्घाटक म्हणून वॉटर या संस्थेचे जिल्हा समन्वयक कांतीलाल गीते उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नितीन शेळके ( जिल्हा विकास व्यवस्थापक राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड, सोलापूर ) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री रवींद्र कांबळे ,तहसीलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे ,गटविकास अधिकारी मनोज राऊत ,सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरी ,वॉटर संस्थेच्या सामाजिक विकास अधिकारी समीना पठाण, विजय पाटील ,पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक प्रत्येक गुरव , वरकटनेचे सरपंच सौ वैजयंता घोरपडे ,आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन तात्यासाहेब मस्कर, सोसायटीचे चेअरमन श्री शरद देवकर हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत .
सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड करमाळा यांच्यावतीने करण्यात येत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago