आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी बचाव समितीने घेतलेली निर्णायक भूमिका ठरली आदीनाथचे गळीत सुरु झाल्याचा आनंद- हरीदास डांगेसाहेब

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ साखर कारखाना चालू करण्यासाठी बचाव समितीने घेतलेली निर्णायक भूमिका ठरली असून कारखाना चालू करण्याचे आपले ध्येय पूर्ण झाल्याचे मत आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी व्यक्त केले. आदिनाथ सुरू करण्यासाठी न्यायालयीन प्रकियेपासुन चालु करण्यापर्यंत आर्थिक नियोजन करण्यासाठी आपण प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना सभासदाची हितचिंतकाची साथ लाभली मात्र आपल्या या कामाकडे श्रेयवादाच्या लढाईत नेते मंडळींनी दुर्लक्ष केल्याने एवढे करून समितीवर केलेले सहकार्याबाबत कुठलेही मत न मांडल्यामुळे आपण नाराज होतो परंतु कामगार सभासद यांच्या आग्रहावास्तव आपण आदिनाथ कारखान्याच्या सेवेसाठी तत्पर झाला आहोत आदिनाथ सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम जोरात चालू करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून कारखाना चालू करण्याची आपले ध्येय होते कारखान्याच्या गळीत हंगाम चालू होत असून ‍ 2350 रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे. उसाचे काटा पेमेंट देण्याची तसेच वाहतुकीचे पेमेंटची सोय करण्यात आली आहे .पेमेंट आता पंधरा दिवसात देण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. तोडणी वाहतुकदाराला चारशे रुपये तसेच उर्वरित पेमेंट वाहतुकीवर २५ %कमिशन देऊन पंधरा दिवसात देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या सहकार्याने आदिनाथ कारखाना चालू होत असून माजी आमदार नारायण आबा पाटील संचालिका रश्मी बागल यांच्या सहकार्याने चेअरमन सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन आदिनाथ कारखान्याला आपल्या अनुभवाचा फायदा मिळवुन देण्यासाठी आपण आदिनाथ मध्ये काम करणार असून कामगार व सभासद यांच्या आग्रहामुळे आदिनाथ कारखाना चालवण्यासाठी आपण वेळ देणार आहे. सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या हितासाठी आदिनाथ कारखान्यांला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे हरिदास डांगे यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

3 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

6 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

6 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

7 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago