केतुर ( अभय माने)
सर्व स्पर्धा परीक्षांचा पाया शालेय जीवनातील विविध परीक्षा आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध पदावर जाण्यासाठी केंद्रीय अभ्यासक्रमानुसार वाटचाल करावी असे विचार श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केले.ते येधील नेताजी सुभाष विद्यालयातील” संरक्षक भिंत बांधकाम समापन उद्घाटन प्रसंगी” आयोजित कार्यक्रमात बोलत होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ. जयसिंगराव देशमुख हे होते.
तर अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. देशमुख म्हणाले की “संस्थेच्या मार्गदर्शनानुसार व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेची विकास कामे होतात, ही कौतुकास्पद बाब आहे, शालेय वातावरण व अभ्यासाच्या दृष्टीने शालेय बाह्य विकासात्मक बाबी सकारात्मक असतात असे बोलून, शाळेचे प्राचार्य डी.ए. मुलाणी यांनी राबवलेल्या “विद्यार्थी दत्तक पालक” योजनेचा त्यांनी गौरव केला.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ऍड.बाळासाहेब जरांडे,माजी सरपंच उदयसिंह मोरे-पाटील, तुकाराम खाटमोडे,प्राचार्य डी.ए.मुलाणी,पर्यवेक्षक षी.जी.बुरुटे, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत पाटील,किरण निंबाळकर, राहुल लखदिवे, प्रा.शिवराज देशमुख, डॉ.मच्छिंद्र नागरे,मालोजी पवार, प्रा.अमोल तळेकर,प्रहार जनशक्ती तालुका महिला समिती प्रमुख सौ. दिपाली डिरे उपस्थित होते.
दरम्यान शाळेतील सहशिक्षिका अश्विनी पवार व सुषमा कोकणे यांच्या योगायोगाने आलेल्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक के.सी. जाधवर यांनी केले तर आर.डी.मदने यांनी आभार मानले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…