करमाळा शहर व ग्रामीण भागात  20जुलै रोजी एक पाॅझिटीव्ह व तीस जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह रुग्णांची संख्या 32

 

करमाळा प्रतिनिधी.                                    करमाळा शहर व तालुक्यात कोरोनाची चांगलीच दहशत निर्माण झाली असून करमाळा शहरात गेल्या तीन ते चार दिवसापासून दररोज कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण जास्त प्रमाणात सापडत होते  परंतु आज मात्र काही प्रमाणात दिलासादायक चित्र असुन 20 जुलै रोजी एकूण 31 जणांची तपासणी केली. त्यामध्ये आळसुंदे गावातील एक पुरुष पाॅझिटीव्ह आला असून विशेष  बाब म्हणजे 30 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत आता एकुण रुग्णाची संख़्या 32 झाली आहे.
करमाळा शहरात अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार केलेले असल्याने नागरिक आता बाहेर पडण्यास घाबरत आहेत. प्रशासनाकडून नागरीकांना वारंवार सांगण्यात येत आहे कि, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा बाहेर येऊ नका. नागरिकांनी प्रशासनाचे नियम पाळावे असेही आवाहन करण्यात येत आहे. 
     

मा. समीर माने तहसीलदार करमाळा

परगावी व परजिल्हा येथील लग्न समारंभ, सोहळे, विविध कार्यक्रम गर्दी करून जाणे टाळावे.  करमाळा तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी.

– समीर माने (तहसीलदार, करमाळा) 

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago