प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांचे सूचनेनुसार जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वीट येथे पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी 1 कोटी 29 लाख 76 हजार 577 रुपये मंजूर झाले असल्याची माहिती वीट गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ वंदना ढेरे यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, वीट गावाला उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते .ग्रामस्थांची ही निकड लक्षात घेऊन आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे आम्ही पाणीपुरवठा योजना विषयी मागणी केली . त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन वीट गावासाठी 1 कोटी 29 लाख रुपये असा भरीव निधी मंजूर केल्यामुळे वीट गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटेल अशी आशा आहे.
चौकट –
ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून दलित वस्तीमध्ये बौद्ध विहार बांधण्यासाठी 9 लाख रुपयाचा निधी आमदार संजयमामा शिंदे यांचे सूचनेनुसार मंजूर झालेला आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांचे वीट ग्रामस्थ कायम ऋणी आहेत.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…