आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू झाला असुन बचाव समितीच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नाला यश आदिनाथ ऊस घालुन सहकार्य करा- हरीदास डांगेसाहेब

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी बचाव समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले  त्याला यश आले असून आदिनाथ सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम सुरू झाला असून बचाव समितीने हाती घेतलेल्या कार्याचे यश असून शेतकरी सभासद यांनी आदिनाथ कारखान्याला ऊस घालून सहकार्य करावे असे आवाहन आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक बचाव समितीचे प्रमुख हरिदास डांगे यांनी व्यक्त केले.गाळपासाठी आलेल्या वाहन मालकाचे स्वागत करून ऊसाचे पुजन करण्यात आले. पुढे बोलताना ते म्हणाले की आदिनाथ सहकारी साखर कारखाना तीन वर्षापासून आर्थिक अडचणीमुळे केलेल्या कराराच्या न्यायालयीन लढ्यामुळे बंद अवस्थेत होता अशा परिस्थितीत आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी आपण बचाव समितीची स्थापना करून त्या माध्यमातून प्रयत्न केले. आदिनाधचा हंगाम उशिरा जरी सुरू झाला तरी आदिनाथ ऊसाचे यशस्वी गाळप करून दोन ते अडीच लाख टन गाळप करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ऊसाचे वाहतुकदारांचे रोख पेमेंट अदा करण्यात येणार आहे. या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री तानाजी सावंत,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रा.शिवाजी सावंत याचे सहकार्य लाभल्यामुळे आदिनाथचे यशस्वी गाळप सुरू करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष धंनजय डोंगरे, उपाध्यक्ष रमेश कांबळे, माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, प्रा. रामदास झोळ, डॉ. वसंतराव पुंडे, संचालक नितीन जगदाळे, डॉ. हरिदास केवारे, करमाळा बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, माजी अध्यक्ष शहाजीबापू देशमुख, कारखान्याचे कार्यकारी संचालक अरुण बागनवर आदी उपस्थित होते. आदिनाथ बचाव समितीमध्ये डॉ. वसंतराव पुंडे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ, आदिनाथचे माजी संचालक शहाजीराव देशमुख, साडेचे मा जि. प सदस्य दत्ता जाधव यांचा अनेक मान्यवरांचे योगदान आर्थिक विशेष सहभाग होता.आदिनाथ बचाव समितीच्या कार्याला माजी आमदार नारायण आबा पाटील रश्मी दिदी बागल यांचे सहकार्य लाभले असुन कारखाना सुरू झाला आहे. सहकारी साखर कारखान्याची यशस्वी गाळप करण्यासाठी चेअरमन धनंजय डोंगरे व्हा.चेअरमन रमेश कांबळे संचालक डॉक्टर हरिदास केवारे संचालक नितीन जगदाळे दिलीप केकान याबरोबर सर्व संचालक मंडळ कामगार यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.         आदिनाथ साखर कारखाना गाळप करण्यास सज्ज झाला असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री तानाजी सावंत,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रा.शिवाजी सावंत यांच्या सहकार्यामुळे सुरू झाला असुन बचाव समितीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन माजी आमदार नारायण आबा पाटील आमच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांच्या मार्गदशनाखाली संचालक मंडळाच्या माध्यमातुन गाळप करणार आहे आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊन काम करणार असल्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सांगितले. धनंजय डोंगरे चेअरमन आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेलगाव भाळवणी

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

4 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago