करमाळा प्रतिनिधी
दरवर्षी उन्हाळ्यात गुळसडी गावातील ग्रामस्थांना होणाऱ्या पाणीटंचाई च्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार गुळसडी गावासाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 1कोटी 44 लाख निधी मंजूर केला आहे. याचबरोबर गावाचे ग्रामदैवत व श्रध्दास्थान असलेल्या श्री काळभैरवनाथ मंदिरा समोर सभा मंडप साठी 7 लाख , काळभैरवनाथ मंदिरा समोर व हजरत ताजुद्दीन बाबा पीर साहेब यांच्या दर्गा समोर पेविंग ब्लॉक साठी 5 लाख , राम मंदिर खंडागळे वस्ती समोर सभा मंडप साठी 7 लाख व दलित वस्तीत रस्ता साठी 5 लाख व जाळे वस्ती येथे गुळसडी -कुंभेज रोडवर माऊली लोंढे यांच्या घरासमोरील पुला साठी 5 असे एकूण 29 लाख निधी मंजूर केला आहे असे माजी सरपंच मानसिंग खंडागळे यांनी सांगितले. एवढा भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आमदार संजयमामा शिंदे यांचे संपूर्ण गुळसडी येथील ग्रामस्थांनी हार्दिक आभार व्यक्त केले..
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…