केत्तूर ( अभय माने ) पारेवाडी (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुनिता सुशीलकुमार सरवदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंच निवड प्रक्रिया नूतन लोकनियुक्त सरपंच वंदना हनुमंत नवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून अमोल जगताप, ग्रामसेवक शंकर शेंडे, गाव कामगार तलाठी लोमटे यांनी अधिकारी म्हणून काम पाहिले .
येथील ग्रामस्थ व समविचारी नागरिकांनी एकत्र येऊन कै. ह भ प धोंडोपंत ग्रामसभा पॅनल करून निवडणूक लढवली होती त्यापैकी सत्ताधाऱ्यांना केवळ दोनच जागा मिळाल्या तर सुमारे 42 वर्षानंतर सत्ता बदल करत लोक नियुक्त सरपंच म्हणून वंदना हनुमंत नवले यांची तर सुनिता सुशीलकुमार सरवदे, कौशल्या मधुकर गुंडगिरे, इंदुबाई नामदेव सोनवणे, संतोष अशोक शिंदे, बापूसाहेब भारत मोरे, गणेश नवनाथ खोटे यांची सदस्य म्हणून निवड झाली होती.उपसरपंच निवडीवेळी सर्व सदस्यांसह महादेव नवले,पांडुरंग नवले, दत्तात्रय घाडगे, मधुकर गुंडगिरे, शिवाजी मोहिते आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यापुरतेच मर्यादित ठेवून निवडणुकीनंतर गावाचा सर्वांगीण विकास साध्य करत गट तट विसरून मतदारांनी दिलेला कौल याची जाण ठेवून गावाचा विकास हेच एकमेव ध्येय ठेवून कारभार चालविणार असल्याचे प्रतिपादन लोकनियुक्त सरपंच वंदना नवले व उपसरपंच सुनीता सरोदे यांनी व्यक्त केली निवडीनंतर दोघींचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
*कोल्हापूर, दि. 15 : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन राष्ट्रवादी युवक…
करमाळा प्रतिनिधी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विविध मंजुर विकासकामा संदर्भात व प्रस्तावित कामांचे मंजुरी बाबत आज देवगिरी…
करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…