देवीचमााळ प्रतिनिधी
सोमवार दिनांक 9 जानेवारी रोजी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली देवीचा माळ येथील विविध विकास कामांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सरपंच महेश सोरटे यांनी दिली.
तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून कमला भवानी मंदिर विकासासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून त्यामध्ये श्रीक्षेत्र कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्ते सिमेंट काँक्रीट व पेविंग ब्लॉक बसविणे – 99.81 लक्ष ,श्रीक्षेत्र कमलादेवी मंदिराकडे जाणारी रस्ते डांबरीकरण करणे- 67.64 लक्ष, संरक्षक भिंत बांधणे 148.76 लक्ष, स्ट्रीट लाईट बसविणे 15 लक्ष, स्नानगृह व मुतारी बांधणे 21 लक्ष, सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे 6 लक्ष असे एकूण 4 कोटी निधी असलेले विकास कामे तसेच पंधरावा वित्त आयोग, ग्राम विकास विभागाकडून 25 15 अंतर्गत झालेली कामे, लोक वर्गणी, जन सुविधा योजना, आमदार निधी या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा सोमवारी संपन्न होणार आहे.
एकूण 4 कोटी 42 लाख रुपये निधीतून उभारलेल्या विविध कामांचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी अध्यक्ष म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत देवीचा माळ यांच्याकडून करण्यात येत आहे.
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन राष्ट्रवादी युवक…
करमाळा प्रतिनिधी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विविध मंजुर विकासकामा संदर्भात व प्रस्तावित कामांचे मंजुरी बाबत आज देवगिरी…
करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…