करमाळाा प्रतिनिधी – केम रेल्वे स्टेशन. ता- करमाळा येथे दोन रेल्वे गाड्यांना पुर्ववत थांबा मिळालेला असुन, आमचे पारेवाडी स्टेशनला पण एक्सप्रेस गाड्यांचा थांबा द्यावा अशी जोरदार मागणी पश्चिम भागातील अभ्यासु युवक नेते ॲड.अजित विघ्ने यांनी केली आहे. सन-१९९८ साली पारेवाडी रेल्वे स्टेशनला केलेला रेलरोको आणि वेळोवेळी दिलेली निवेदने देऊन आम्ही अक्षरशः कंटाळलो आहोत.. वस्तुतः पारेवाडी रेल्वे स्थानक आणि शेजारचे पंचवीस गावांचा विचार करता आणि पारेवाडी पासुन जेऊर स्टेशनचे २८ कि.मी चे अंतर, भिगवण स्टेशनचे३० कि.मी चे अंतर याचाही विचार करून ट्रायल बेसीस वर तरी या स्टेशनवर एक्सप्रेस उभीच राहीली पाहीजे. या स्टेशन ला मासे,भाजीपाला सह प्रवाशांची संख्या जास्त आहे याचाही विचार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी रेल्वेचे अधिकारी आणि खासदार. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार. संजयमामा शिंदे, माजी आमदार. जयवंतराव जगताप, माजी आमदार. नारायण पाटील यांचे समोर व्यक्त केली व जोरदारपणे मागणी केली. याप्रसंगी आमदार. संजयमामा शिंदे यांनी या मागणीचे पत्र खासदार. निंबाळकर यांना सुपुर्द केले असुन, खासदार. निंबाळकर यांनी देखिल पारेवाडी स्टेशन चे प्रवाशांचे मागणीची दखल घेऊन एक्सप्रेस गाडीला थांबा देणेबाबत सकारात्मक पाऊले उचलणार असलेचे सांगितले आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी ॲॅड. अजित विघ्ने यांना याबाबतची माहीती विचारली असता.. जोपर्यंत एक्सप्रेस गाडीला थांबा मिळणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालुच राहणार असलेबाबत सागितले आहे.
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन राष्ट्रवादी युवक…
करमाळा प्रतिनिधी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विविध मंजुर विकासकामा संदर्भात व प्रस्तावित कामांचे मंजुरी बाबत आज देवगिरी…
करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…