करमाळा प्रतिनिधी मांगीरोडला असलेल्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत अर्थात एम.आय.डी.सी.मधील उद्योगांसाठी असलेल्या प्लाँटचे सद्याचे दर उद्योजकांना परवडणारे नाहीत.त्यामुळे जमिनीच्या प्लाँटचे दर शासनाने प्रतिचौरसमीटर १०० ते १५० रूपये एवढे ठेवावेत.म्हणजे उद्योजकांना दिलासा मिळेल असे प्रतिपादन श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी आज करमाळा येथे केले. याबाबत अधिक बोलताना श्री बागल म्हणाले की,करमाळा शहरालगत मांगी रोडला लागुनच महाराष्ट्र औद्योगिक वसाहत लोकनेते स्व.दिगंबररावजी बागल मामा हे आमदार असतांनाच मंजूर करून घेतली होती. तालुक्यातील युवक उद्योजकांसाठी व करमाळा तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला या औद्योगिक वसाहतीमुळे एम आय डी सी मुळे काम मिळेल व तालुक्यातील जनतेला दिलासा मिळेल या भुमिकेतून या एम.आय.डी.सीची मंजुरी आणुन ४६ हेक्टर जमीन शासनाने त्याचवेळी एमआय डीसी करीता अधिग्रहित केली होती. परंतु एखाद्या उद्योजकाला जर काही उद्योग अथवा कारखाने सुरू करायचे असतील तर एमआयडीसी मधील जमिनींचे प्लाँटचे दर सद्या ७०० रुपये प्रतिचौरसमीटर इतके आहेत.हे दर खुप जास्त असुन राज्यात कोणत्याही एमआयडीसी मध्ये एवढे प्लाँटचे दर नाहीत. ही बाब उद्योजकांवर अन्यायकारक आहेत. त्यामुळे करमाळा एमआयडीसी मध्ये उद्योग सुरू करण्यासाठी वा स्थापीत करण्यासाठी कंपन्या कारखानदार पुढे येत नाहीत. याशिवाय तेथे उद्योगांकरीता शाश्वत पाणीपुरवठ्याची सुविधा नाही. त्यामुळे इच्छा असुनही अनेक उद्योजक आकर्षित होत नाहीत. पर्यायाने करमाळा शहर व तालुक्याचा विकास थांबलेला आहे. वास्तविक पाहता शासनाने उद्योजकांसाठी केवळ १०० ते १५० रुपये प्रतिचौरसमीटर या दराने प्लाँटची विक्री करावी जेणेकरून अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांना निश्चितपणे दिलासा मिळेल. याबाबत लवकरच मुंबई येथे राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब व राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा.उद्योगमंत्री यांना समक्ष भेटुन विनंती करणार असल्याचे शेवटी श्री बागल यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…