Categories: करमाळा

सुरतालच्या रौप्य महोत्सवानिमित्त करमाळाकरांना दिली संगीत व नृत्याची पर्वणी


करमाळा प्रतिनिधी सुरताल संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत नृत्य महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दिल्ली, आसाम, गोवाहाटी,ओरीसा या राज्यातून आलेल्या कलाकारांनी आपल्या कलेतून रसिकांची मने जिंकली.
करमाळा येथील सूरताल संगीत विद्यालयाचा रजत जयंती कार्यक्रमानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिल्ली येथील डॉ.आम्रपाली त्रिवेदी, डॉ. मनीषा देवी गोस्वामी: गुवाहटी (आसाम) भरतनाट्यम, गुरु स्वप्नाली गोस्वामी: गुवाहटी (आसाम) सत्रिय नृत्य, डॉ. पंकज नामसूद्रा: गुवाहाटी (आसाम) सत्रिय नृत्य, ज्योतिर्मयी मोहंती: भुवनेश्वर (ओरिसा) ओडिसी नृत्य इत्यादी विविध राज्यातील नामवंत कलाकारांनी आपली कला प्रस्तुत केली. या कलाकारांना संस्थेच्या वतीने “सुर सरस्वती” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर5 विद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी ही आपले गायन- वादन सादरीकरण केले.
या कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे व यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांना विद्यालयाच्या वतीने ‘संगीत रसिक’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते अंक प्रकाशन ही करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर कामगार न्यायालयाचे न्यायाधीश मा. शरद देशपांडे साहेब, ॲड शिरीष देशपांडे, डॉ. बाबुराव हिरडे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर, मकाई साखर कारखान्याचे माजी संचालक विवेक येवले, राष्ट्रवादी सेलचे अश्फाक जमादार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना विलासराव घुमरे म्हणाले की, सुरताल संगीत विद्यालयासाठी भविष्यात सर्वतोपरी मदत केली जाईल. यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील म्हणाले की श्री नरारे सर यांनी सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक लहानापासून मोठ्यापर्यंत विद्यार्थी घडविण्याचे काम अगदी मनापासून केलेली सेवा आहे. याच सेवेच्या माध्यमातून अनेक कलाकार तयार होत आहेत. देश विदेशातून ही कलाकार येऊन करमाळा सारख्या ग्रामीण भागामध्ये येऊन आपली कला सादर करतात. त्यामुळे करमाळ्याचे नाव देशातच नाही तर बाहेर देशात सुद्धा पोहोचविण्याचे काम नरारे सरांनी केलेले आहे. त्यामुळे सूर ताल विद्यालयासाठी आपण तन-मन-धनाने सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.
यावेळी करमाळा तालुक्यातील पत्रकारांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील संगीत रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, सूत्रसंचालन रेश्मा जाधव, सायली पदमाळे, सारिका विटूकडे यांनी तर आभार कु. स्वराली जाधव यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago