Categories: करमाळा

नामदेवरावजी जगताप साहेब यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळाच्या आवारातील पूर्णाकृती पुतळयास विनम्र अभिवादन

करमाळा प्रतिनिधी देशभक्त सोलापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष, सोलापूर जिल्हा मध्य .सह . बँकेचे माजी चेअरमन, एस टी महामंडळाचे सदस्य , सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष,उजनी धरणाचे जनक, मांगी तलावाचे प्रणेते, विद्या विकास मंडळ करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक युगपुरुष माजी आमदार कै.नामदेवरावजी जगताप साहेब यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळाच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्यास करमाळा तालुक्याचे विकासरत्न आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतरावजी जगताप, युवक हृदय सम्राट तथा जगताप गटाचे युवा नेते- शंभूराजे जयवंतरावजी जगताप* यांनी त्यांच्या पवित्र देशभक्त कै नामदेवरावजी जगताप यांच्या १०३ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजपाचे युवानेते शंभुराजे जगताप, माजी उपनगराध्यक्ष नारायण जगताप, बाजार समितीचे सभापती प्रा . शिवाजी बंडगर, सचिव विठ्ठल क्षिरसागर व अन्य सहकारी स्मृतीस विनम्र अभिवादन केले. यावेळी शेतकरी, व्यापारी, गटसचिव, जिल्हा बँक, शैक्षणिक संस्था व मार्केट कमिटीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

जिल्हा परिषद शाळांत पहिलीपासून सेमी इंग्रजीसाठी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची आढावा बैठक आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणीला गती देण्याचे नियोजन;

; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…

12 hours ago

गाव तिथे भाजपा, बूथ तिथे शाखा’ अभियानाला सोलापूर ग्रामीण पश्चिममध्ये सुरुवात संघटनात्मक बांधणीला वेग भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पांडे व धायखिंडी येथे भाजपा शाखांचे उद्घाटन

  करमाळा प्रतिनिधी  : भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष…

19 hours ago

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

2 days ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

2 days ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

2 days ago