करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील 24 गावांना वरदान ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरू झाले असून हे आवर्तन टेल टू हेड या पद्धतीने चालणार असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांची पाणी मागणी कमी असली तरी आवर्तन सुरू केलेले आहे ,कारण दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले तलाव, बंधारे , मातीनाला बांध पूर्ण क्षमतेने भरण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे उन्हाळी आवर्तनावरती जास्त ताण येणार नाही असे नियोजन आहे. शेतकऱ्यांनी कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 ( दहिगाव योजना ) या कार्यालयाशी संपर्क साधून आपले पाणी मागणी अर्ज जास्तीत जास्त संख्येने जमा करून द्यावेत व येणाऱ्या काळात पाणीपट्टी भरण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे .
चौकट…
सायफण टाकणारावर गुन्हा दाखल करणार – उपअभियंता अवताडे.
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सध्या सुरू आहे .या आवर्तनामध्ये टप्पा 1 व टप्पा 2 या दोन्ही ठिकाणी मुख्य कॅनॉलवरती अनेक शेतकरी सायफन टाकून बेकायदेशीरपणे 24 तास पाण्याचा उपसा करत असतात. त्यामुळे असे सायफन टाकणाऱ्या शेतकऱ्यांचे सायफण जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांनी सायफण टाकू नयेत.
ज्या शेतकऱ्यांना पाणी घ्यायचे आहे त्यांनी मागणी अर्ज भरून विद्युत पंपाद्वारे पाणी उचलावे. बेकायदेशीरपणे चारी फोडणे ,सायफण द्वारे पाणी घेणे हा गुन्हा असून या गुन्ह्यासाठी कोणाचीही गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून देण्यासाठी दहिगाव कार्यालयाचे शाखा अभियंता श्री शिंदे – 9881027913 व श्री कांबळे – 9421870107 यांच्याशी संपर्क साधावा.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…