करमाळा प्रतिनिधी
शेतकऱ्याच्या दुधाला दहा रुपये अनुदान देऊन कोरोनाच्या संकटकाळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे
इमेलद्वारे केली आहे यावेळी नानासाहेब मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
“दुधाला प्रतिलीटर 10 रुपये अनुदान तातडीने द्यावे अन्यथा या शेतकऱ्यांच्या हितासाठी व या प्रमुख मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरणार आहे.
तरी राज्यसरकारने 10 रुपये अनुदान तातडीने दयावे,शासनाच्या नियमानुसार गाईच्या दुधासाठी 27 रुपये 50 पैसे तर म्हशींच्या दुधासाठी 34 रुपये दर मिळणे आवश्यक असतानाही खासगी,सहकारी,शासकीय दूध संघांनी दूध दरात मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे.
तसेच चीन युरोप व आफ्रिका या देशातील दूध पावडर निर्यात बंद झाली आहे.यामुळे देशात सध्या 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक आहे तर राज्यात देखील 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे व तरीही केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सर्व बाबींमुळे दूध पावडरचा 330 रुपयांवरून 180 रुपयांवर आला आहे.परिणामी दुधाचा दरही 10 ते 15 रु ने कमी झाला आहे.त्यामुळे सरकारने दुधाला 10 रु लिटर प्रमाणे अनुदान द्यावे.दूध पावडरकरीता प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे.दूध पावडर बटर व तूप यावरील GST कमी करण्यात यावे. तसेच अनुदानासह केंद्र सरकारने 30 हजार टन. दूध पावडरचा बफर स्टॉक करावा-. दिलीप(बाप्पू)धोत्रे . जिल्हाध्यक्ष म.न.से
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…