करमाळा प्रतिनिधी
शनिवार दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी शाळेच्या मैदानात शाळा सरपडोह येथील विद्यार्थ्यां चा बाल आनंद बाजार खूप मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शाळेतील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अवघ्या 2 तासात भाजीपाला विक्रीतून विद्यार्थ्यांनी सुमारे 10000 रुपयांचा व्यवहार पार पाडला. या साठी पालकांनी खूप मोठा सहभाग नोंदवला व मुलांकडून भाजीपाला खरेदी करून प्रोत्साहन दिले.
या आनंद बाजार चे उदघाटन शाळा समितीचे अध्यक्ष श्री शरद घोगरे यांचे हस्ते झाले. या वेळी सरपंच सौ मालनताई वाळके, उपसरपंच श्री नाथराव रंदवे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्यवस्थापन चे सर्व सदस्य , पोलीस पाटील व पालक ,माता पालक उपस्थित होते.
या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री नारायण डौले व सर्व शिक्षक बंधूनी केले . बाल आनंद बाजार अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वी रित्या संपन्न झाला.
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…