Categories: करमाळा

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समृद्ध गावासाठी गावासाठी फिसरे ग्रामस्थांनी कसली कंबर

करमाळा -विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक 17 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत फिसरे गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.या शिबीरात 1000 वृक्ष लागवड,पन्नास शौचालये बांधणे,सेंद्रिय शेती कार्यशाळा,आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन,मतदान जनजागृती व नोंदणी,महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम व विधवा महिलांचा सन्मान, जनावरांचे लसीकरण,सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रबोधन,संपूर्ण गावातील कुटुंबाचा विमा उतरवणे,विविध व्याख्यानातून ग्रामस्थांचे परिवर्तन असे अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत.या शिबीराची पूर्वतयारी म्हणून आज फिसरे गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे उदघाटन ग्रामपंचायत सदस्य मा.प्रशांत नेटके यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रदीप दौंडे हे होते तर प्रमुख उपस्थितीत उपसरपंच विजय अवताडे भरत अवताडे डॉ.पोपट नेटके मा. सुभाष नेटके हे होते.यावेळी भरत अवताडे यांनी आमच्या विद्यार्थी दशेत जर अशी शिबीरे अनुभवायला मिळाली असती तर आज फिसरे गाव आणखी जास्त विकसित झाले असते अशी खंत व्यक्त केली.तर डॉ.पोपट नेटके व मा.डमाले सर यांनी शिबीरासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी 17 जानेवारीला होणाऱ्या शिबीराची रूपरेषा स्पष्ट केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच संदीप नेटके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. एम.डी.जाधव यांनी केले व आभार प्रा.बी.एच.मस्कर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, प्रतिष्ठित मंडळी, ग्रामस्थ व जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका,अंगणवाडी सेविका, विद्यार्थी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समृद्ध गावासाठी फिसरे ग्रामस्थांनी कसली कंबर
करमाळा -विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक 17 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत फिसरे गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.या शिबीरात 1000 वृक्ष लागवड,पन्नास शौचालये बांधणे,सेंद्रिय शेती कार्यशाळा,आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन,मतदान जनजागृती व नोंदणी,महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम व विधवा महिलांचा सन्मान, जनावरांचे लसीकरण,सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रबोधन,संपूर्ण गावातील कुटुंबाचा विमा उतरवणे,विविध व्याख्यानातून ग्रामस्थांचे परिवर्तन असे अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत.या शिबीराची पूर्वतयारी म्हणून आज फिसरे गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे उदघाटन ग्रामपंचायत सदस्य मा.प्रशांत नेटके यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रदीप दौंडे हे होते तर प्रमुख उपस्थितीत उपसरपंच विजय अवताडे भरत अवताडे डॉ.पोपट नेटके मा. सुभाष नेटके हे होते.यावेळी भरत अवताडे यांनी आमच्या विद्यार्थी दशेत जर अशी शिबीरे अनुभवायला मिळाली असती तर आज फिसरे गाव आणखी जास्त विकसित झाले असते अशी खंत व्यक्त केली.तर डॉ.पोपट नेटके व मा.डमाले सर यांनी शिबीरासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी 17 जानेवारीला होणाऱ्या शिबीराची रूपरेषा स्पष्ट केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच संदीप नेटके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. एम.डी.जाधव यांनी केले व आभार प्रा.बी.एच.मस्कर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, प्रतिष्ठित मंडळी, ग्रामस्थ व जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका,अंगणवाडी सेविका, विद्यार्थी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

6 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

9 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago