करमाळा प्रतिनिधी श्री मकाई साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिम्मित दत्त मंदिर विकास नगर करमाळा येथे बागल गटाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होत. या रक्तदान शिबिरात बागल प्रेमी युवक कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल युवा नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आले या रक्तदान शिबिराला मान्यवरांनी भेट देऊन रक्तदान केले तसेच आपल्या लाडक्या युवा नेत्याचा शाल श्रीफळ मानाचा फेटा बांधून सत्कार केला. याप्रसंगी आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे, बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, उपसभापती चिंतामणी दादा जगताप, आदीनाथचे संचालक नानासाहेब लोकरे, नाना पठाडे महाराज,रघुवीर जाधव, मकाईचे संचालक रामभाऊ हाके,आशिष गायकवाड,अमोल झाकणे,देवा ढेरे, कार्यकारी संचालक हरिचंद्र खाटमोडे प्रशासन अधिकारी बनसोडे साहेब, दिनेश भांडवलकर धनंजय झिंजाडे,नगरसेवक शौकत नालबंद,सचिन घोलप,जयकुुुुमार कांबळेे, तांबोळी अल्तांफ ज्योतीराम लावंंड मेजर मा. सरपंच विष्णू रंदवे ॲड दत्तात्रय सोनवणे, सचिन बापू पिसाळ, सौदागर दौंड ,दत्ता निंबाळकर अनिल पवार विकास रोकडे भैरू कदम जांलिधर रोडगे संदीप खटके,महेश तळेकर,कुलदिप पाटील,रणजीत शिंदेे रेेवण निकत याच्यांसह मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या रक्तदात्यास दिग्विजय बागल यांचा फोटो असलेला जर्किंग भेट देण्यात आला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बागल गट यांच्यावतीने धनंजय ढेरे रविभाऊ शेळके मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.