_करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा पंचायत समिती येथे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला._
_सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या सोलापूर जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या करमाळा तालुका अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांच्या संकल्पनेतून दिनदर्शिका तयार केली आहे. यावेळी बोलताना सरपंच डॉ. दुरंदे म्हणाले की परिषदेच्या माध्यमातून आम्ही सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत असून या सोबत गावच्या विकासासाठी आम्ही परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करित आहोत. तालुक्यातील प्रत्येक गावात व कार्यालयात सरपंच परिषदेचे काम पोहचवण्याचं आम्ही या दिनदर्शिकेचा माध्यमातून करित आहोत._
_यावेळी गटविकास अधिकारी राऊत यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, नवनाथ दुरंदे इतर सर्व उपस्तिथ सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. प्रदेश सरचिटणीस adv.विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख यांनी करमाळा सरपंच परिषदेचे कौतुक केले, खूप छान माहिती दिनदर्शिक मध्ये उपलब्ध आहे आणि आपल्याकडून नेहमी अशीच सेवा घडत राहो अश्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समिती मधील कर्मचारी उपस्थित होते._
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…