Categories: करमाळा

आमदार संजयमामा शिंदे यांचा गाव- भेट दौरा प्रत्यक्ष संवाद सर्वसामान्यांना लाभदायक- ॲड अजित विघ्ने

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावागावात जाऊन सर्वसामान्यांच्या बरोबर बसुन नागरिकांशी संवाद व्हावा या हेतुने *आमदार संजयमामा शिंदे* यांचे मार्गदर्शनातुन *आमदार आपल्या गावी- विकासकामांवर चर्चा व्हावी* हा कार्यक्रम गाव- भेट दौर्‍यातुन चालु असुन *कंदर ते वांगी*,*पारेवाडी ते जिंती- रामवाडी*,*दिवेगव्हाण ते कावळवाडी* असा दौरा नुकताच पार पडला.. या दौर्‍यामधे लोक सहभाग घेत असुन विविध वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्नांवर आमदार साहेब व अधिकारी, पदाधिकारी यांचेबरोबर चर्चा करून रखडलेली कामे मार्गी लावताना दिसत आहेत. या दौऱ्यातुन विज , रस्ते , पाणी या बाबत चर्चा होत असुन.. बऱ्याच ठिकाणी स्वातंत्र्य काळापासुन स्मशानभुमी, दफनभुमी नाही याचेही प्रश्न समोर आले आहेत. नागरिकांमधुन शेती( पाणंद)रस्त्यासाठी मागणी असल्याचे दिसत असुन, वैयक्तिक स्वरूपाचे अडीअडचणी मधे महसुल विभागाकडील तक्रारी असल्याचे दिसत आहे. रेशनवरील माल व्यवस्थित मिळत नाही.. तसेच फक्त आंगठा( थम) उमटला नाही म्हणुन रेशनिंग बंद झाल्याचे तक्रारी भरपुर प्रमाणात आहे.. याबाबत ज्या त्या डिपार्टमेंटचे अधिकारी वर्गाला आमदार साहेबांनी तात्काळ सुचना दिलेल्या असुन.. सार्वजनिक झालेली कामे आणि भविष्यकाळात करायची कामे याबाबत आमदार संजयमामांचे पुढील विकासकामांचे व्हीजन काय आहे याबाबतही चर्चा होत असुन, मागिल कोरोनाचा दोन वर्षाचा काळ, त्यानंतर सरकारची झालेली बदलाबदल त्यामुळे काही रखडलेली कामे, योजना लवकरच मार्गी लागणार आहेत.. याबाबतही चर्चा होत असुन, जनसामान्यांचे आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी करमाळा, जेऊर, कोर्टी व तालुक्यातील इतर ठिकाणी आरोग्य केंद्र व उपकेंद्र यामधे जास्तीच्या सुविधा दिलेल्या असुन, कुकडी, दहीगाव सिंचन प्रकल्पातुन पाणी मिळविण्यास गेल्या तीन-साडेतीन वर्षात यश आलेचे दिसुन येत असुन, याबाबत लोकांमधुन समाधान व्यक्त होत आहे. विशेषतः या प्रकल्पातील लोकांच्या शेतजमिनी कॅनाल करीता संपादीत झालेल्या होत्या त्यांनाही त्यांचे संपादनाचे पैसे मिळाले बाबत लोक सांगताना दिसत आहेत. कोर्टी- विहाळ कारखान्यालगत कुकडी कॅनाल चारीचे बोगदयाचे काम मार्गी लावल्यामुळे लवकरच सिंचन क्षेत्र वाढणार असुन, सिंचनाचे बाबतीत आमदार रोहीत पवार आणि आमदार संजयमामा यांनी केलेल्या कामाचे कौतुक होताना दिसत आहे. काही गावातुन एस.टी ची सोय व्हावी म्हणुनही मागणी होत असुन.. सर्वात महत्वाचे सर्वसामान्य नागरिक या कार्यक्रमातुन आपला दबलेल्या आवाज झिडकारून आमदार. संजयमामा शिंदे यांचेशी विविध प्रश्नांवर प्रत्यक्ष संवाद करत आहेत आणि अनेक विकासात्मक प्रश्न हिरिरीने मांडत आहेत.. ही बाब करमाळा तालुक्याचे दृष्टीने निश्चित चांगली असुन.. या गाव भेट दौर्‍यातुन गावागावातील सुशिक्षित तरुण सहभागी होऊन आपल्या गावासाठी विकासाचे प्रश्न उपस्थित करून आपल्या गावाला,परिसराला विकासाचे वाटेवर नेहण्याचे स्वप्न पहात आहे. गावोगावचे अनेक तरुण मुले जी नोकरीचे, उदयोग व्यवसायाचे निमित्त बाहेरगावी पुण्या-मुंबईला राहतात त्यांनी देखिल गाव भेट दौर्‍याला उपस्थिती दाखवली आहे..*गाव- भेट दौरा* हा फक्त संवाद आणि चर्चा नसुन.. भविष्यकाळात करमाळा तालुक्यात होणाऱ्या भरीव विकासाची नांदी असेल. आमदार. संजयमामा शिंदे यांनी कोणतीही राजकीय चर्चा न करता, किंवा कोणत्याही विरोधकावर कसलीही टिका टिप्पणी न करता हाती घेतलेला हा कार्यक्रम निश्चितपणे सर्वसामान्यांचे हितासाठी असुन, याचे लोकही भरभरून कौतुक करीत आहेत. प्रत्येक गावातील किमान दहा तरी लोक आमदार. संजयमांमाचे कायम संपर्कात असतात हेही लोकांचे बोलण्यातुन स्पष्ट होत होते.. एखादयाने आमदार. संजयमामांना डायरेक्ट फोन केला आणि मामांनी तात्काळ उचलता आला नाही तरी मामा परत कॉल करून हितगुज साधतात हे ही लोकांनी आवर्जुन या भेटीत सांगितले.. आजची पिढी ग्लोबल होत आहे. शेतीमधेही नवनवीन तंत्रज्ञान राबविण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे… कष्टाचे जीवावर आज सर्वसामान्य शेतकर्यांची मुले शिक्षण घेऊन समृद्ध झाली आहेत.. त्यामुळे नवीन पिढीला राजकारणा पेक्षा आणि कुरघोड्या पेक्षा आपल्या गावाचे विकासासाठी योगदान देणाऱ्या आणि निकोप चर्चा करणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता होती, ती आवश्यकता आमदार. संजयमामांनी भरून काढल्याचे अनेक तरूण बोलत आहेत… विकासकामांची प्रक्रिया ही निरंतरपणे चालणारी प्रक्रीया असुन गावात असणारी शंभर कामे एकाच झटक्यात होणार नाहीत परंतु टप्याटप्याने एक एक सोई सुविधा निर्माण केल्यास गावे सुजलाम सुफलाम होतील हे नक्की.. गावामधे राजकारण विरहीत गट-तट- पक्ष-भेद विसरून गावचे विकासाचे आराखडे तयार व्हावेत… आणि या विकासाकरीता लागणारी मदत आणि येणाऱ्या अडचणी आमदार. संजयमामा शिंदे सोडवतील याबाबत जनसामान्यात विश्वास निर्माण झालेला आहे. आज गावोगावी कधीही एकत्र न येणारी माणसे आमदार. संजयमामांचे गाव भेट दौर्‍याचे वेळी विकासकामांवर चर्चा करताना पहायला मिळत आहेत… ही बाब करमाळा तालुक्याचे दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहे.*एकंदरीत आमदार संजयमामांचा गाव- भेट दौरा सर्वसामान्यांसाठी लाभदायक ठरत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

11 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

20 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

20 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

1 day ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

1 day ago