करमाळा प्रतिनिधी
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती व मकर संक्रांतीचे औचित्य साधून जि.प.प्रा.शाळा पोंधवडी येथील पदवीधर शिक्षिका मनीषा हरिश्चंद्र पेटकर (सौ बाभळे) यांनी करमाळा नगर पालिकेतील स्वच्छता कामगार महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला.व सर्व महिलांना संक्रांतीचे वाण म्हणून स्टेनलेस स्टीलच्या कप्याच्या ताटांचे व तिळगुळाचे वाटप करण्यात आले.प्रास्ताविकात सौ मनिषा बाभळे यांनी दरवर्षी संक्रांतीला विविध प्रकारचे उपक्रम जसे की महिलांना 500 तुळशीच्या रोपांचे वाटप, करंज,पिंपळ,वड,चाफा अशा मोठ्या वृक्षांचे वाटप,गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,जैन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 5500रु ची देणगी असे उपक्रम राबविले असल्याचे सांगितले.कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून करमाळा शहर स्वच्छ ठेवण्याचे काम स्वच्छता कामगार महिलांने केले.या त्यांच्या कार्याची दखल घेऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून,प्रेमाची भेट म्हणून हे वाण दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सौ भावना गांधी व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती कुसुमबाई पेटकर सौ मंजिरी जोशी,सौ ऋतुजा दोशी, सौ प्रिया परदेशी संतोषी सोळंकी,सौ देशमुख (माने). मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमात उपस्थित महिलांचे मनोरंजन सौ मंजिरी जोशी यांनी वऱ्हाड निघाले लंडनला हा एकपात्री प्रयोग सादर करून केले.सौ भावना गांधी यांनी महिलांच्या अडचणी, समस्या व त्यावरील उपाय सांगून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.शालन कांबळे यांनी सौ बाभळे मॅडम यांनी आमचा जो सन्मान केला, प्रेम रूपी भेट दिली, सन्मानाने हळदीकुंकूवाचा कार्यक्रम राबविला हा कार्यक्रम आमच्या स्मरणात कायम राहील.आम्ही कोरोना काळात केलेल्या कामाची दखल कोणीतरी घेतली हे पाहून मन आनंदित झाले.प्रिया परदेशी व ऋतुजा दोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री सुधीर काशिनाथ बाभळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…