करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांचे सहकाराचे मंदिर असून हा कारखाना यशस्वीपणे सुरू झाला असुन प्रत्येक सभासदांनी आपला 20 टक्के ऊस देऊन आदिनाथ साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले .आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या उत्पादित पाच साखरेच्या पोते पूजन प्रसंगी ते बोलत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी आमदार नारायण आबा पाटील आदिनाथच्या संचालिका रश्मी दीदी बागल यांच्या सहकार्याने कारखाना सुरु झाला आहे यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत जिल्हा प्रमुख महेश चिवटे माजी आमदार नारायण आबा पाटील चेअरमन धनंजय डोंगरे व्हाईस चेअरमन रमेश कांबळे माजी संचालक डॉक्टर वसंतराव पुंडे, आदिनाथ बचाव समितीचे हरिदास डांगे संचालक नानासाहेब लोकरे डाॅ. हरिदास केवारे ,नितीन जगदाळे, कार्यकारी संचालक अरुण बागनवरसाहेब प्रशासन अधिकारी कदमसाहेब उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचै एकूण 32 हजार सभासद असून कारखाना गाळपाचे उद्दीष्ठ पुर्ण करण्यासाठी प्रत्येक सभासदाच्या 20 टक्के उसाची गरज असून आदिनाथने आपल्याला साथ दिली आहे आता आपली वेळ आहे साथ देण्याची करमाळा तालुक्याचा वैभव असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना खाजगीकरणापासून वाचला असून सहकारी तत्त्वावर हा कारखाना सर्व सभासद हितचिंतक मान्यवर नेते मंडळी कार्यकर्ते यांच्या जीवावर वाचला असुन .यशस्वीपणे गाळप करीत आहे उसाचे पेमेंट ताबडतोब दिले जात आहे तरी सभासदानी आदिनाथला ऊस घालुन सहकार्य करा असे आवाहन प्रा.रामदास झोळ सर यांनी केले आहे.