करमाळा प्रतिनिधी आदिनाथ साखर कारखाना सभासदांच्या विश्वासाच्या बळावर सुरळीत चालू झाला असून कारखान्यामधून उत्तम प्रतीचे साखर उत्पादन सुरू झाले आहे, आदिनाथ मध्ये प्रथम उत्पादित साखर पोत्यांचे पूजन आज मकरसंक्रातीच्या पर्वावर रविवारी प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. आदिनाथ साखर कारखाना सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी असताना आदिनाथ सुरू झाला ही करमाळा तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत, शिवाजीराव सावंत, माजी आमदार नारायणआबा पाटील,रश्मीदिदी बागल यांनी बहुमोल सहकार्य केल्यामुळे आम्ही कारखाना चालू करु शकलो अशी माहिती आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिली आहे. ज्या शेतक-यांनी आदिनाथ कारखान्याला ऊस गळीतास दिला आहे त्या ऊसाचे पेमेंट व तोडणी वाहतूक तात्काळ देण्यात येत आहे यासाठी जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी आदिनाथला ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. मागील तीन वर्ष आदिनाथ साखर कारखाना बंद असल्याने या हंगामामध्ये कारखाना चालू होणार नाही अशी परिस्थिती असताना तालुक्यातील सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही कारखाना चालू करु शकलो आहोत असे त्यांनी सांगितले. तसेच चालू गळीत हंगामात आम्ही सभासदांना न्याय देण्यास बांधील आहोत असे त्यांनी पुढे म्हटले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मार्गदर्शक संचालीका रश्मी दिदी बागल उपस्थित राहू शकल्या नाहीत यावेळी माजी आमदार नारायणआबा पाटील, तसेच व्हा. चेअरमन रमेश कांबळे,संचालक नितीन जगदाळे, नानासाहेब लोकरे, हरिदास केवारे, पांडुरंग जाधव,नामदेव भोगे, आणि डाॅ. वसंतराव पुंडे, हरिदास डांगे, रामदास झोळ महेश चिवटे, शिवाजी बंडगर सर मकाईचे संचालक संतोष देशमुख,कल्याण सरडे, अर्जुन तकीक व कारखान्याचे कार्यकारी संचालक अरुण बागनवर वर्क्स मॅनेजर प्रल्हाद आटोळे,चिफ केमिस्ट खाडे, चिफ अकौंटंट सतीश पोळ, शेती अधिकारी दिपक खटके, कार्यालय अधिक्षक मधुकर कदम, सिव्हिल इंजिनिअर अभंग, इलेक्ट्रिक इंजीनियर दिपक देशमुख, स्टोअरकीपर शरद काकडे इत्यादी उपस्थित होते.
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…
करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…
करमाळा प्रतिनिधी Tv 9 मराठीचे करमाळा येथील पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य…
करमाळा प्रतिनिधी पुरुषाबरोबर स्त्रिया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असून स्वतःच्या पायावर उभा राहूनच आपल्या…
सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…
भिगवण प्रतिनिधी : स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या…