दत्तकला शिक्षण संकुलात सुवर्ण महोत्सव 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिमाखदार वातावरणात संपन्न

भिगवण प्रतिनिधी 

 ९ जानेवारी रोजी  पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती दौंड व दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दत्तकला शिक्षण संस्थेत मोठ्या दिमाखात पार पडले या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आयुष प्रसाद साहेब यांनी केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामदास झोळ सर लाभले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री राणा साहेब सूर्यवंशी संस्थेच्या सचिवा माननीय सौ झोळ मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच दौंड तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय श्री अजिंक्य येळे साहेब करमाळा तालुक्यातील यश कल्याणी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री गणेश करे पाटील दौंड तालुका गटशिक्षण अधिकारी माननीय श्री कळमकर साहेब पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव माननीय श्री प्रसाद गायकवाड साहेब दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नातू साहेब पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव माननीय श्री भुजबळ साहेब पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहाय्यक संपादक माननीय श्री सुंबे साहेब दौंड तालुका विज्ञान शिक्षक संघाचे माननीय श्री शितोळे साहेब पंचायत समिती दौंड चे विस्तार अधिकारी माननीय श्री मुलाणी साहेब दौंड तालुका विस्तार अधिकारी माननीय श्री रसाळ साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते दत्तकला शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री डॉक्टर विशाल बाबर सर ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर माननीय श्री ताटे मॅडम ग्रुप दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य माननीय यादव मॅडम कार्यक्रम यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन या कार्यक्रमात जवळजवळ 281 प्रकल्प विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सादर केले विशेष म्हणजे यावेळी अनेक शिक्षकांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला तर प्रयोगशाळा सहाय्यक यांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांची चहा नाष्टा व जेवणाची उत्तम सोय केली. संस्थेने सर्व शिक्षक विद्यार्थी स्पर्धक यांची काळजी घेतली आणि सर्वदौंड तालुक्यातील सर्व शिक्षकांनीही दत्तकला शिक्षण संस्थेचे भरभरून कौतुक केले समाधान व्यक्त केले यापुढेही जिल्हास्तरीय प्रदर्शन दत्तकला शिक्षण संस्थेत पार पडावे अशी अपेक्षा सगळ्यांनी व्यक्त केली. विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी बोलताना माननीय श्री आयुष प्रसाद साहेब यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. खरी गुणवत्ता ही ग्रामीण भागातच असते फक्त ती ओळखता आली पाहिजे असे त्यांनी म्हटले तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री झोळसर आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी हा फक्त ज्ञानाचा भारवाहक न होता तो ज्ञानाचा निर्माता झाला पाहिजे विद्यार्थी हा सर्व गुणसंपन्न असावा अभ्यासाबरोबरच त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि यासाठी दत्तकला शिक्षण संस्था प्रयत्न करीत आहे असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच पुढील वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन निवासी शाळा सुरू करण्याचा एक उत्तम निर्णय मी घेत आहे असे सरांनी सांगितले यावेळी दहा तारखेला बक्षीस वितरण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमालाही पुणे ग्रामीणचे एडिशनल एस पी माननीय श्री भोईटे साहेब माजी आमदार पीडीसी बँकेचे डायरेक्टर माननीय श्री रमेश आप्पा थोरात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या कमिशनर माननीय सौ दराडे मॅडम दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री झोळसर शिक्षण संस्थेचे दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री राणा साहेब दत्तकला शिक्षण संस्थेचे सचिवा माननीय झोळ मॅडम माननीय श्री भाऊसाहेब पाटील , दैनिक सकाळचे मा. डॉक्टर प्रशांत चौरे साहेब, दैनिक पुढारीचे मा. श्री.तांबे साहेब तसेच दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे मा. श्री चितळकर साहेब कार्यक्रमाला उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन या कार्यक्रमांमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा प्रश्नमंजुषा आधी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते निबंध स्पर्धेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे छोटा गट सहावी ते नववी प्रथम क्रमांक- कुंभार स्मृती गणेश मनोरमा मेमोरियल हायस्कूल केडगाव द्वितीय क्रमांक -पवळ अवधूत शरद संत तुकडोजी विद्यालय दौंड तृतीय क्रमांक -भोसले प्रांजल अनिल श्री सिद्धेश्वर विद्यालय पिंपळगाव 

नवी ते बारावी मोठा गट प्रथम क्रमांक -नवले अथर्व अनिल कैलास विद्यामंदिर राहू द्वितीय क्रमांक -चव्हाण वैष्णवी दशरथ नागेश्वर विद्यालय पाटस तृतीय क्रमांक -गिरी साक्षी दशरथ जवाहरलाल विद्यालय केडगाव
भाषण स्पर्धा
प्रथम क्रमांक -गायकवाड कार्तिकी राजेंद्र मनोरमा मेमोरियल हायस्कूल केडगाव द्वितीय क्रमांक- सपकाळ संस्कार माणिक नागेश्वर विद्यालय पाटस तृतीय क्रमांक -इनामदार साजन रफिक भैरवनाथ विद्यालय खुटबाव
मोठा गट नववी ते बारावी प्रथम क्रमांक .वैष्णवी राजेंद्र नागवडे न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज खामगाव द्वितीय क्रमांक .कांबळे दीक्षा. शेठ ज्योती प्रसाद विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज दौंड. तृतीय क्रमांक .ननवरे वैभवी कुलदीप. शिवा व्हॅली स्कूल देऊळगाव गाडा. मंडलिक पूजा रामहरी. उत्तेजनार्थ मनोरमा मेमोरियल हायस्कूल केडगाव.
प्रश्नमंजुषा नववी ते बारावी मोठा गट
प्रथम क्रमांक फिरंगाई माता मंदिर कुरकुंभ.
द्वितीय क्रमांक. नागेश्वर विद्यालय पाटस.
तृतीय क्रमांक. श्री गुरुकृपा विद्यालय वासुंदे.

प्रश्नमंजुषा छोटा गट सहावी ते आठवी
प्रथम क्रमांक. ज्ञानराज पब्लिक स्कूल दौंड.
द्वितीय क्रमांक. न्यू इंग्लिश स्कूल खामगाव.
तृतीय क्रमांक. श्री भैरवनाथ विद्यालय खडकी.
विज्ञान प्रयोग निकाल.
छोटा गट
प्रथम -बनसोडे प्रज्ञा प्रकाश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी. प्रयोगाचे नाव लाईव्ह सिस्टीम.
द्वितीय क्रमांक. श्री योग माध्यमिक विद्यालय बिटवाडी. लाईव्ह सेविंग स्टिक .
तृतीय क्रमांक. दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज स्वामी चिंचोली. हेल्थ अँड क्लीननेस.
मोठा गट.
गार्डी ओम संतोष. संस्कार प्रायमरी हायस्कूल दौंड. प्रयोगाचे नाव मल्टी फंक्शनल ॲग्री रोबोट.
द्वितीय क्रमांक. जगदाळे वेदांत शशिकांत. लर्न अँड प्ले स्कूल दौंड स्मार्ट हाऊस.
तृतीय क्रमांक. मोरया शुभम विजय. श्री फिरंगाई माता विद्यालय कुरकुंभ. रेडिओ ॲक्टर डोअर.
गट तीन.
प्राथमिक शिक्षक.
प्रथम क्रमांक फडके विद्या भाऊसाहेब. जवाहर माध्यमिक विद्यालय केडगाव. टीचिंग एड.
द्वितीय क्रमांक. श्री भांडवलकर संतोष सर्जेराव. दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज स्वामी चिंचोली. मॅजिक स्लेट
गट चार.
माध्यमिक शिक्षक.
प्रथम क्रमांक श्री कांबळे विशाल तुकाराम. न्यू इंग्लिश स्कूल खामगाव.
इलेक्ट्रिक करंट अँड इफेक्ट .
द्वितीय क्रमांक. शिंदे ए आर. न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव. मॅथेमॅटिक्स मॉडेल.
गट पाच.
प्रयोगशाळा सहाय्यक.
प्रथम क्रमांक. श्री नरके नंदू अनंत. जिजामाता विद्यालय गोपाळवाडी. एलबी जयहिंद विद्यालय कासुर्डी दूरदर्शी इत्यादी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दत्तकला शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांचे भर भरून कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्राचार्या यादव मॅडम यांनी मांडले तर कार्यक्रमाचे यज्ञ मॅडम यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

समरसतेची वारी… साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी… साहित्यिकांची घरी’* या उपक्रमाचा शुभारंभ

सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…

8 hours ago

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर पार्टी उत्साहात साजरी*

भिगवण प्रतिनिधी  : स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या…

8 hours ago

करमाळा विधानसभेत गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी जिल्ह्यात एक नंबर होईल – चेतनसिंह केदार

करमाळा प्रतिनिधी - भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा विधानसभा सदस्य नोंदणी मध्ये…

9 hours ago

डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना या संस्थेच्यावतीने शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या भिम अनुयायांना मोफत अन्नदान

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना या संस्थेच्या वतीने शौर्यदिनानिमित्त कोरेगाव…

1 day ago

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

करमाळा प्रतिनिधी. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने डॉ…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी न समजलेले आई-बाप या विषयावर व्याख्यान

करमाळा प्रतिनिधी.प्रा निकत सरांचे ज्ञानसेवा सोशल फाऊंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या वर्धापन दिनानिमित्त मा…

1 day ago