वांगी नं 1 ते पांगरे या रस्त्याला पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून प्रशासकीय तांत्रिक अशा दोन्हीही मंजुरी रस्ता संघर्ष समितीचे यश पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा

करमाळा प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1,2,3,4,भिवरवाडी, ढोकरी, नरसोबावाडी, पांगरे या गावातील नागरिकांच्या साठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या वांगी नंबर 1 ते पांगरे या रस्त्याला पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून प्रशासकीय व तांत्रिक अशा दोन्हीही मंजुरी मिळाल्याने हा रस्ता मंजुर व्हावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार्या वांगी परिसरातील लोकांना न्याय मिळवून देणार्या “रस्ता संघर्ष समितीने पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला .तब्बल 4 कोटी 66 लाख 50 हजार इतका निधी मिळाल्याने व लवकरच टेंडर निघणार असल्याने वांगी परिसरातील नागरिक रस्ता संघर्ष समिती ला धन्यवाद देत आहेत.
याप्रसंगी रस्ता संघर्ष समिती चे सदस्य आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, बाजार समिती चे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर, आदिनाथ चे संचालक पांडुरंग जाधव,आदिनाथचे माजी संचालक भारत साळुंके , महेंद्र पाटील,वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, अर्जुन आबा तकीक, ग्रामपंचायत सदस्य दत्ता बापू देशमुख, तानाजी देशमुख, सचिन पिसाळ, रामेश्वर तळेकर, ग्रा.प . सदस्य धनंजय गायकवाड, सेंद्रिय शेती चे पुरस्कर्ते हनु यादव,अॅड, दिपक देशमुख, ढोकरी चे सरपंच देवा पाटील,माजी सरपंच महादेव वाघमोडे, देवीदास पाटील, पांडुरंग खरात, सुभाष वळसे, बाबासाहेब चौगुले, कुंडला गडदे, सोमा घाडगे,रोहित आहेरकर,गणेश पाटील, देवा तळेकर , वांगी सोसायटीचे संचालक नितीन देशमुख, आप्पासाहेब भोसले, बापूराव तोबरे , ग्राम पंचायत सदस्य अमर आरकीले ,संदेश पाटील , वांगी ४ – भिवरवाडी ग्रां. प. उप सरपंच डॉक्टर भाऊसाहेब शेळके, आप्पा आरकिले , उत्तम धनवे , संजय रोकडे यांच्या सह वांगी पंचक्रोशीतील रस्ता संघर्ष समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शहाजी राव देशमुख, प्रा शिवाजीराव बंडगर, महेंद्र पाटील या रस्ता संघर्ष समिती च्या प्रमुखांनी रस्ता संघर्ष समितीने सतत पाठपुरावा व संघर्ष केल्यामुळेच हे यश मिळाल्याचे आपल्या भाषणात सांगितले . माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार नारायण आबा पाटील, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे उपअभियंता भिलारे, व वरिष्ठांनी सहकार्य केल्या बद्दल क्रतज्ञताही व्यक्त केली.
4 कोटी 66 लाख पन्नास हजार इतना निधि वांगी नंबर 1 ते पांगरे या रस्त्यासाठी मंजूर केल्याबद्दल आनंद व्यक्त करित एकमेकांना पेढे भरवले .*
*वांगी परिसरातील वांगी नंबर 1,2,3,4,ढोकरी बिटरगाव, भिवरवाडी, नरसोबावाडी या गावांनी उजनी धरणासाठी आपले सर्वस्व त्यागले आहे . या विस्थापित गावांचे पुनर्वसन होताना ज्या गंभीर त्रुटी राहिल्या त्याची फळे 45 वर्षा नंतर ही येथील नागरिक भोगत आहेत.
धरणग्रस्तांना अग्रहक्काने देय असलेल्या नागरी सुविधा पैकी पोहोच रस्ते अध्याप ही मिळाले नसल्याने आदिवासी प्रमाणे इथल्या लोकांचे जिणे आहे. ढोकरी ते शेलगाव, पांगरे ते वांगी नंबर 1हे दोन रस्ते या भागाच्या नसा आहेत.
*ढोकरी ते शेलगाव या रस्त्यासाठी ही अतीव संघर्ष उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती ने सलग 25 वर्षे केला.त्याला यश येवून काही वर्षांपूर्वी पूर्ण झाला आहे .
*परंतु त्याला ग्रहण लागले अन वांगी नंबर 3 च्या बाह्यवळण मार्गावर स्थानिक शेतकर्यांनी अडथळा केला.रस्ता संघर्ष समिती ने सलग तीन वर्षे अविरत, अहोरात्र प्रयत्न करून महसूल खाते,न्यायालय यातून दावे जिंकून रस्ता खुला केला.

दरम्यान वांगी नंबर 1 ते पांगरे हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे . हे प्रशासनाला, तालुक्यातील नेतेमंडळीना ,खासदारांना , आदिंच्या भेटी गाठी घेऊन सतत पाठपुरावा रस्ता संघर्ष समिती च्या प्रमुखांनी केला. शिवाय पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे सोलापूर, मुंबई येथील कार्यालयाशी सतत संपर्क ठेवून वरीष्ठ अधिकारी याना अंदाजपत्रक मंजूरीला पाठवण्याची विनंती करीत असत.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मागील काही दिवसात वांगी परिसरातील नागरिकांना भेटण्यासाठी गावभेट दोऱ्यावर आले असता त्याना या बाबत रस्ता संघर्ष समिती ने अवगत केले होते . त्यांनी अधिकारी याना सूचना केल्या. केम ता.करमाळा येथे मागील आठवड्यात रेल्वेच्या कार्यक्रमात येथे ही रस्ता संघर्ष समिती च्या प्रमुखांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.त्यावेळी त्यानी आठवड्यात प्रशासकीय मंजूरी येईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे उपअभियंता भिलारे यानी आज प्रशासकीय व तांत्रिक अशा दोन्ही ही मंजुरी आल्याचे सांगितले.
त्यामुळे रस्ता संघर्ष समिती च्या कार्यकर्त्यांनी वांगी नंबर 1येथील चौकात फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला आभार रस्ता संघर्ष समिती चे सदस्य अर्जून तकीक यानी मानले .सूत्रसंचालन वांगी चे माजी सरपंच विठ्ठल शेळके यानी केले,स्वागत हनु यादव, बाबासाहेब चौगुले, देवा पाटील, यानी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

जगद्गगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्यावतीने जेऊर येथे 7 जानेवारीला महारक्तदान शिबिराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने 4 जानेवारी रोजी जेऊर येथे महा…

3 hours ago

सुरताल संगीत विद्यालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरताल महोत्सवाचे आयोजन*

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सूर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने प्रती वर्षाप्रमाणे दि. ६ जानेवारी २०२५…

2 days ago

करमाळा भाजपाकडून विविध उपक्रमांनी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी- भाजपा नेते,भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती करमाळा भाजपाकडून विविध कार्यक्रमांनी…

2 days ago

गुरु गणेश गोपालन संस्था यांच्यावतीने गुरू गणेश मिश्री ध्यान केंद्राचे उद्घघाटन गुरु महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे उप प्रवर्तक प. पु. श्रुत मुनीजी म.सा…

3 days ago

भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह…

4 days ago