करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय विद्या विकास मंडळाचे सचिव मा.विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , उपप्राचार्य कॅप्टन संभाजीराव किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व फिसरे ग्रामपंचायत, फिसरे यांच्या संयुक्त विद्यमाने 17 जानेवारी 2023 ते 23 जानेवारी 2023 दरम्यान *युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास* हे ब्रीदवाक्य घेऊन फिसरे गावात शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरांची पूर्वतयारी म्हणून रॅलीचे आयोजन केले गेले व अनेक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष संपर्क साधून शिबिरासाठी सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. या शिबिराचे उद्घाटन करमाळ्याचे तहसीलदार मा. समीर माने यांच्या शुभहस्ते व संस्थेचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर यांच्या अध्यक्षतेखाली उदया दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी संपन्न होणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी , उद्योजक भरत अवताडे , माजी सरपंच प्रदीप दौंड , उपसरपंच विजय अवताडे , माजी उपसरपंच संदीप नेटके, प्रदीप गुरव (पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक)आशिष लाड , ग्रामपंचायत सदस्य हनुमंत रोकडे , ग्रामसेवक दादासाहेब केवारे या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. सदर शिबिरात मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023रोजी अनिल केंगार मुंबई यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच बुधवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजता आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. तर रात्री 7.00 वाजता जयंत करंदीकर यांचे व्याख्यान होणार आहे . गुरुवार दिनांक 19 जानेवारी रोजी 12 ते 4 या वेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी 7.00 वाजता तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांचे प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केलेले आहे. तसेच शुक्रवार दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजता कैलास मस्कर यांचे सिंचनाच्या माहितीपर व्याख्यान होणार आहे तर सायंकाळी 7.00 वाजता मधोजी महाविद्यालय , फलटणचे माजी प्राचार्य डॉ.सुधीर इंगळे यांचे व्याख्यान होणार आहे .
शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळ 11.00 वाजता संस्थेच्या विश्वस्त व महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या संचालिका सौ. रश्मी दीदी बागल-कोलते यांच्या अध्यक्षतेखाली हळदी-कुंकू कार्यक्रम तर सायंकाळी 7. 00 वाजता यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष श्री. गणेश करे-पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी 7.00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरेसाहेब व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या हस्ते होणार आहे.
या शिबिराचा सांगता समारंभ सोमवार दिनांक 23 जानेवारी रोजी दुपारी 12.15 मिनिटांनी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सदर शिबिरात 50 शौचालये ,10,000 वृक्ष लागवड , 50 शेतकऱ्यांसाठी गांडूळ खत प्रकल्प , हळदी-कुंकू कार्यक्रम व विधवा महिलांचा सन्मान , प्लास्टिक मुक्त गाव , ठिबक सिंचन , सेंद्रिय शेती भूमिपुत्रांचा सन्मान , आरोग्य शिबिर , प्रबोधनपर व्याख्यान असे अनेक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सदर शिबिरात फिसरे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील व उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांनी केले आहे .
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…