जिल्हास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत जि.प.प्रा.केंद्र शाळा पोथरे ची कुमारी समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिचा मोठ्या गटात सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी गुणवत्ता शोधण्यासाठी राबवण्यात येण्याऱ्या टॅलेंट हंट अंतर्गत जिखास्तरीय कथाकथन स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मोडनिंब येथे घेण्यात आले होते
तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर संधी देण्यात आली होती.मोठ्या गटात पूर्ण जिल्ह्यातून एकूण 22 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मोठ्या गटातून करमाळा तालुक्यातील पोथरे शाळेची इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त समृद्धीचा माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.बंडू शिंदे आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं.निशिगंधा माळी यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तिला याकामी तिच्या वर्गशिक्षिका सौं.शगुफ्ता शेख (हुंडेकरी) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
समृद्धीच्या या उत्तुंग यशाबद्दल करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार पाटील साहेब, विस्ताराधिकारी श्री.जयवंत नलवडे साहेब , पोथरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.निशांत खारगे साहेब,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.बप्पासाहेब शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सन्माननीय सदस्य आणि शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री.गजेंद्र गुरव सर यांनी समृद्धी आणि तिचे मार्गदर्शक शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…