करमाळा प्रतिनिधी नेतृत्वाकडे चौकस बुद्धीमत्ता आणि दुरदृष्टी असावे असे प्रत्येकालाच वाटते.
आपल्या करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार. संजयमामा शिंदे हे नेतृत्व देखिल दुरदृष्टी ठेवुन करमाळा तालुक्याचे विकासाचे नियोजन करताना दिसत आहेत. नुकताच ब्रिटीश- कालिन असणारा जिल्हा हद्द ते कोंढार चिंचोली पुलाचा काही भाग कोसळला.. पुलावरून जाणारी वाहतुक थांबविण्यात आली.. या पुलाची तातडीने डागडुजी व्हावी व रस्ता खुला व्हावा अशी सर्वसामान्य नागरिकांतुन सुर ऊमटु लागला.. यासाठी दुरुस्ती साठीची मंजुरी, निविदा प्रक्रीया आणि तत्सम गोष्टी कराव्या लागतात.. आम्ही आमदार साहेबांना याबाबत कळविले.. मामांनी तात्काळ सांगितले काळजी करू नका पुलाचे दुरुस्ती साठी आपण आधीच तरतुद करून ठेवलेली आहे.. वरिष्ठांशी बोलुन तातडीने अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले.. आणि तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावेच लागेल म्हणुन निक्षुण सांगितले.. विशेषतः याबाबतचे पत्र पुराव्यासह मला देखिल पाठवुन दिले. आम्हा कार्यकर्त्यांना तर अपेक्षितही नव्हते.. कारण या ठिकाणी *नविन पुलाचे करिता ५५ कोटींची प्रशासकीय मंजुरी* मिळवलेली आहे. त्याचे टेंडर होऊन लवकरच कामही चालु होईल..*जुना पुल जो आपल्या पश्चिम भागाची वरदायीनी आहे.. ज्यावरून आपण कित्येक दिवस प्रवास करतो, त्याची खरी किंमत आज सर्वांनाच कळतेय.. त्याचे आयुष्य संपलेय हेही सर्वांनाच कळतयं परंतु या पुलाचे सुद्धा आमदार साहेबांनी स्ट्रक्चरल ऑडीट करायला लावले आणि हा ब्रिटीश- कालीन पुल हेरिटेज( संग्रहीत) म्हणुन जतन करण्याकरीता पाऊले उचलली.. या पुलाचा बाल्कनी प्रमाणे उपयोग करून पक्षी निरिक्षणा करिता पाँइट म्हणुन वापर करणे बाबतची नुसती चर्चा केली नाही तर प्रत्यक्षात हा विषय कागदावर आणला आणि विशेष म्हणजे आज ना उदया या पुलाची डागडुजी करणे भाग पडेल हे ओळखून यासाठीही २ कोटी रुपयांची तरतुद दुरुस्ती करीता करून ठेवली*.. आज जरी या पुलाचा काही भाग निकामी झाला असला तरी लवकरच डागडुजी करीता सुरुवात होईल हे नक्की.. *कोरोनाचा दोन वर्षाचा खडतर काळ गेला.. चालु वर्षात बदललेली सत्तेतील समीकरणे , तरी देखिल आमदार साहेबांनी तालुक्यातील अनेक प्रश्न हिंमतीने मार्गी लावले आहेत.*
करमाळा तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न गंभीरतेने घेऊन आपल्या तालुक्यातील शासकीय दवाखाने प्रशस्थ केलेले आहेत.
*करमाळा शहरासाठी जवळपास दहा ते पंधरा कोटींचा निधी दिलेला असुन, आई कमलाभवानीचे मंदीर व परिसर सुशोभिकरण करीता देखिल कोट्यावधी रुपयांचा निधी मंजुर केला आहे*
विजेच्या भेडसावणाऱ्या महत्वाच्या प्रश्नाबाबत आखणी करून कात्रज, आवाटी, रायगाव सह अनेक उपकेंद्रे मंजुर केली असुन अनेक ठिकाणी आवश्यकते प्रमाणे जादा ट्रान्सफार्मर बसविणे कामी कार्यवाही केली आहे.. विजेच्या बाबतीत तालुक्याचा प्रत्येक भाग स्वयंपुर्ण झाला पाहीजे या उद्देशाने अनेक नविन प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीचे प्रतिक्षेत आहेत.
*वस्तुतः मामासाहेब आमदार झालेपासुन उजनी मायनस तीस च्या खाली गेले नाही आणि सिना नदीचे पात्र दुथडी भरून वाहते आहे.. कोळगाव धरणकाठ त्यामुळे हिरवागार दिसत आहे*
कुकडी प्रकल्पातुन येणारे प्रत्येक आवर्तन वेळच्या वेळी येण्यासाठी सततचा पाठपुरावा ठेऊन पाणी उपलब्ध करून दिले असुन ज्या भागात आजपर्यंत कधीच पाणी येत नव्हते तिथपर्यंत म्हणजे टेलएण्ड पर्यंत पाणी आणण्याची किमया मामांनी केली आहे.
*विशेषतः कुकडी प्रकल्प, दहीगाव प्रकल्प करीता संपादीत शेत जमिनीचा मोबदला शेतकरी वर्गाला मिळवुन दिला आहे, ज्याचे वाटप आजही चालुच आहे*
कुकडीचे डाव्या कालव्यातुन पुरेसे पाणी मिळत नसल्याने करमाळा तालुक्याचे हक्काचे पाणी उजनी धरणात आणुन ते लिफ्ट द्वारे लाभक्षेत्रात आवर्तन आणण्यासाठीचे महत्वाकांक्षी पाऊल उचलले असुन, कुकडी उजनी सिंचन टप्पा-१ उद्भव वाशिंबे- रिटेवाडी( डिलिवरी- मोरवड. के एलडी बोगदा आणि टप्पा-२ उदभव- केत्तुर( डिलिवरी- सावडी, चिलवडी- कोर्टी शाखा) या टप्प्यात उपसा सिंचन योजना राबविणे बाबत प्रस्ताव करून सर्वेक्षणाचे आदेश लवकरच प्राप्त होतील.
*विशेषतः विहाळ- मोरवड येथील बोगदाचे काम तातडीने पुर्णत्वास आणले आहे*
आपल्या मतदार संघाच्या प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीचा इतंभुत अभ्यास आमदार संजयमामांच्या बोलण्यातुन आणि कृतीतुन दिसत असुन, कोणावर कसलीही टिका टिप्पणी न करता आपले तालुक्याचे विकासाचे काम नेटाने चालु आहे.
*कृष्णा पाणी तंटा लवाद-२ च्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या वाटयाला येणाऱ्या अतिरिक्त पाण्यातुन झरे, पोफळज, सालसे,हिवरे,हिसरे, फिसरे, वडशिवणे,देवळाली, मलवडी, पार्थुर्डी,रोपळे या गावांचा समावेश होणेकरीताचा प्रस्ताव शासन दरबारी मांडला असुन, या भागातील शेतीकरीता जवळपास २० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता असल्याचे मत आमदार. संजपमामा शिंदे यांनी अभ्यासातुन मांडले आहे. यामुळे जवळजवळ चार हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.*
कृष्णा पाणी तंटा लवाद -२ मधुन मांगी मध्यम प्रकल्प करीता देखिल पाण्याची मागणी केलेली आहे. तसेच भिमा- सिना जोड कालव्यातुन बेंद नाला मधे पाणी उपलब्ध झाल्पास तेथील३००० हे. आर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे प्रयोजन केलेले आहे.
*मांगी सह वडशिवणे, वीट, राजुरी, नेरले, म्हसेवाडी, हिंगणी, पारेवाडी, कोंढेज या तलावांची भरावाची व सांडव्याची दुरुस्ती, तसेच पोटेगाव बंधारा बांधकामाची दुरुस्ती करणे करीता निधीची मागणी केलेली आहे.*
दहीगाव उपसा सिंचन करीता वाढीव सुप्रमा ला मंजुरी मिळवली असुन, कालव्यांचे अस्तरीकरण करून घेतलेले आहे.
*सर्वात महत्वाचे म्हणजे अहमदनगर ते टेंभुर्णी महामार्ग क्रं-५१६ अ चा जातेगाव ते टेंभुर्णी हा भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करून महाराष्ट्र शासनाकडुन नाहरकत प्रमाणपत्र मिळवुन दिले आणि माननीय. केंद्रीय रस्ते- वहातुक मंत्री नितीन गडकरी साहेब यांचेकडुन या रस्त्यासाठी भरीव निधीही प्राप्त केलेला आहे.
या व्यतिरिक्त अनेक रस्त्यांचे कामा करीता निधी उपलब्ध केलेला असुन *भविष्यात आपला करमाळा तालुका सर्वांगिण सुजलाम-सुफलाम होईल यासाठीचे तंतोतंत नियोजन केलेले आहे. मामासाहेब एक व्हिजन असणारे नेतृत्व असुन.. विकासाची खरी दृष्टी असणारे नेतृत्व आहे*( ही सर्व माहीती आमदार संजयमामा यांनी केलेल्या पाठपुराव्यातील असुन याबाबतचे संपुर्ण पुरावेसह आहे. त्यामुळे वारंवार राजकारणासाठी खोट्या वल्गना करणाऱ्या मंडळींना चपराक आहे.)
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…