करमाळा प्रतिनिधी सध्याची शिक्षण पद्धती डिजिटल झाली असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी प्रगतीसाठी या पध्दतीचा साधनाचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे मत नगरसेविका सौ.स्वातीताई फंड यांनी व्यक्त केले.अंगणवाडीतील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी यशकल्याणी सेवाभावी संस्थेकडुन महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते थोर शिक्षणतज्ञ डॉ.एन.डी.पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त करमाळा शहरातील मौलाली नगर बालवाडीला स्मार्ट टि.व्ही.सप्रेम भेट देण्यात आला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे फंड यांनी सांगितले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते गणेश करे पाटील मुख्याध्यापक वसंत बोधे गुरुजी सारिका सनगर उपस्थित होती स्वर्गीय एन डी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुलांच्या शैक्षणिक विकास साठी अंगणवाडी एलईडी टीव्ही संच अंगणवाडी सेविका सुनिता शिंगाडे यांना देण्यात आला. यावेळी गणेश करे पाटील, वसंत बोधे गुरुजी ,स्वातीताई फंड,एकात्मिक बाल विकास सेवा योजनाच्या सुपरवायझर संनगर मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले मुलांच्या डिजिटल जमान्यात नक्कीच मुलांना शिकवण्यासाठी या टीव्हीचा उपयोग होईल असे त्यांनी सांगितले . यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा पाटील मॅडम यांनी यांचे मार्गदर्शन लाभले यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन केले सूत्रसंचालन सुनिता शिंगाडे मॅडम यांनी केले तर आभार बडे मॅडम यांनी मानले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…