करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात अहिल्यादेवी सिंचन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विहीर मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत विहिरीचा लाभ आदेश मिळाला नसल्यामुळे त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी सर्व लाभार्थी त्यांचे नातेवाईक यांच्यासह 26 जानेवारीपासून आपल्या कार्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मीबाई आवटे यांनी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की अहिल्यादेवी सिंचन महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2020- 21 अंतर्गत या योजनेअंतर्गत दोनशे बेचाळीस 242लाभार्थ्यांना विहीर मंजूर करण्यात आलेली आहे सदर विहीर मंजूर होऊन दोन वर्षे होत आहेत तरी देखील अद्यापपर्यंत लाभार्थ्यांना सदरील कामाचे मंजुरी आदेश मिळाले नाहीत व आजपर्यंत त्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्या नसल्यामुळे आम्ही सर्व लाभार्थी आपल्या कार्यालयासमोर सदरील योजनेच्या कार्यालयामध्ये पर्यंत दिनांक 26 जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनापासून सकाळी दहा वाजलेपासून आमरण उपोषण सुरू करणार आहोत तरी याची आपण नोंद घेऊन सगळे योजनेचे कार्यवाही जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सदर उपोषण मागे घेणार नसल्याचे जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी आवटे यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…