Categories: करमाळा

शेतीपूरक व्यवसायात महीलांचा सहभाग वाढल्यास प्रगती शक्य:- कृषीभूषण नामदेव साबळे

शेटफळ प्रतिनिधी 

शेतीपूरक व्यवसायात महीलांचा सहभाग वाढल्यास शेतकरी कुटुंबाची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन कृषीभूषण नामदेव साबळे यांनी शेटफळ ता करमाळा येथे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन – कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) करमाळा यांचे वतीने शेटफळ येथील जिजाऊ महिला शेतकरी गट व लोकविकास फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या पुढाकाराने महिला शेतकरी सदस्यांसाठी आयोजित किसानगोष्टी कार्यक्रमात बोलताना केले पुढे बोलताना ते म्हणाले की कृषिपूरक व्यवसायामध्ये शेळीपालन हा किफायतशीर व्यवसाय आहे.महीलांनी यामधील बारकावे समजावून घेऊन हा व्यावसाय केल्यास तो यशस्वी होऊन कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लावू शकतो.यावेळी त्यांनी स्वतः करत असलेले बंदिस्त शेळीपालन व जंगली कुक्कुटपालन याविषयी मार्गदर्शन केले. व सेंद्रिय शेतीचे महत्व स्पष्ट केले.यावेळी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न‌प्रकीया उद्योग या योजनेबद्दल जिल्हा संसाधन व्यक्ती मनोज बोबडे यांनी शेतकरी, शेतकरी गट , व महीलांनी एकत्र येत शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारू शकतात यासाठी शासनाकडून पस्तीस टक्के सबसिडी मिळू शकते याची सविस्तर माहिती महिलांना दिली. कृषी साह्यक सुप्रिया शेलार यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयावर महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी महिलांचा हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला उपस्थित महिलांना फुले व फळांची रोपे भेट देऊन स्वागत जिजाऊ महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा हर्षाली नाईकनवरे मंदाकिनी साळूंके,गंगाताई लबडे निता पोळ,प्रतिभा पोळ,विद्या जाधव यांनी केले सुरवातीला प्रास्ताविक कृषी विभागाच्या रोहीनी सरडे यांनी केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अजय बागल यांनी केले तर आभार सत्यम झिंजाडे यांनी मानले.या कार्यक्रमाला मिनाताई वळेकर, माधुरी साळूंके, वनिता निंबाळकर,सुदामती लबडे, अर्चना चोरगे,सुवर्णा लबडे, शुभांगी पोळ,नंदा उंबरे,सुमन पोळ,कमल लबडे,रत्तन लबडे सुनिता लबडे ,रूणिता लबडे निता टकले,पारूबाई लोखंडे,रुपाली साबळे यांच्यासह गावातील महीला शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

24 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago