करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ साखर कारखाना सभासदांच्या विश्वासाच्या बळावर जोरदार जोमाने चालू झाला असून कारखान्यामधून उत्तम प्रतीचे साखर उत्पादन सुरू झाले आहे, कोणीही अधिकार नसलेली माणसे आदिनाथ बद्दल चूकीची माहिती पसरवून खोट्या प्रसिद्धीच्या मागे जात आहेत हे अतिशय दुर्दैवी बाब आहे अशा माणसांना विनंती आहे की आपण कारखान्याला अडचणीत आणू नका असे कळकळीचे आवाहन चेअरमन धनंजय डोंगरे यांनी केले आहे. विशेष बाब म्हणजे हरिदास डांगे व चिवटे हे गेल्या दहा दिवसात कारखान्याकडे फिरकले सुध्दा नाहीत तसेच हरिदास डांगे यांचा शेलगाव येथे ३ ते ४ किलोमीटर अंतरावर ऊस असताना कारखाना १० किलोमीटर प्रमाणे ऊस वाहतूक देत आहे परंतु त्यांचा ऊस २५ किलोमीटर अंतरावर दाखवावा अशी अपेक्षा त्यांची आहे परंतु याला संचालक मंडळाने हरकत घेतल्याने त्यांनी संचालक मंडळाची बदनामी सुरू केली आहे, संचालक मंडळ सभेत सर्वानुमते नेहमी प्रमाणे अनुभवी ठेकेदार यांना कंत्राटी कामे देण्यात आली आहेत कंत्राटी कामे व्यवस्थित पणे चालू आहेत, कारखाना मिल चार दिवसापुर्वी बंद करावी लागत होती, परंतु दोन दिवसापासून सुरळीत पणे कारखाना सुरू असून याचीच या लोकांना पोटदुखी असल्याचे दिसून येत आहे कोणत्याही प्रकारचे घाणेरडे राजकारण सभासद शेतकरी खपवून घेणार नाहीत आदिनाथ महाराज अशा वाईट प्रवृत्तीना माफ करणार नाहीत बचाव समितीला कारखाना संचालक मंडळ सभेला बोलावण्यात येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे विशेषतः कारखाना संचालक मंडळ हे सभासदांनी निवडलेले आहे यामध्ये त्रयस्थ व्यक्तिला बोलावणे कारखाना पोट नियमाच्या विरोधात आहे, माजी आमदार नारायण पाटील व आमच्या मार्गदर्शक संचालिका रश्मी दिदी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना जोमाने सुरू आहे असे त्यांनी पुढे म्हटले आहे. हरिदास डांगे यांचा अनुभव व वयाचा विचार करून संचालक मंडळाने त्यांच्या शब्दाला किमंत दिली परंतु डांगे यांनी आदिनाथ महाराज मंदिरात १ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आणि ही घोषणा फक्त प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे दिसून आले आहे. संचालक मंडळाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ९ ते १० कोटींची खरेदी केली कारखाना सुरू व्हावा यासाठी संचालक मंडळाने त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेतले असल्याचे व्हाईस चेअरमन रमेश कांबळे यांनी म्हटले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…