करमाळा प्रतिनिधी
सहकारी साखर कारखान्याच्या एक ते पंचवीस किलोमीटर अंतरावर एक लाख मॅट्रिक टन ऊस असून या ऊस वाहतुकीसाठी प्रति टन 25 किलोमीटर अंतराच्या दराने वाहतूक दिली तर जवळपास एक लाख मेट्रिक टनाचे ऊस गाळप आदिनाथ चे अजून होऊ शकते मात्र जाणीवपूर्वक आदिनाथ कारखाना अडचणीत आणायचे ही भूमिका अजूनही संचालक मंडळ सोडत नसून संचालक मंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे आदिनाथ पुन्हा नुकसानीत जाईल का अशी भीती निर्माण झाली आहे असा आरोप बचाव समितीचे निमंत्रक हरिदास डांगे व अध्यक्ष महेश चिवटे यांनी केला आहे.गेल्या दहा दिवसात साखर हमालीचे टेंडर देण्यात संचालक मंडळात वाद झाल्यामुळे साखर जाम झाल्यामुळे गाळप कमी झाले
एकंदरीत संचालक मंडळ बचाव समितीला विश्वासात न घेता अजूनही राजकीय स्वार्थासाठी चुकीचे निर्णय घेऊन आदिनाथ अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत वारंवार सूचना देऊन सुद्धा संचालक मंडळ बचाव समितीच्या सूचना कडे दुर्लक्ष करतात
संचालक मंडळाच्या बैठकीला समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलवत नाहीत
आज आदिनाथ कारखान्याच्या कंपाऊंड शेजारचा ऊस बाहेरचे कारखाने घेऊन जात आहे केवळ वाहतुकीचे दर निश्चित न केल्यामुळे दुसऱ्या कारखान्याला जात आहे.एक ते 25 किलोमीटर अंतराच्या दरम्यानच्या सर्व उसाला 25 किलोमीटर प्रमाणे वाहतूक दिली तर दररोज कारखाना 3500 मॅट्रिक टन उसाचे गाळप करेल.याकडे जाणीवपूर्वक संचालक मंडळ दुर्लक्ष करत आहे.याच पद्धतीने माळीनगर म्हैसगाव कमलाई या कारखान्याने धोरण करून उसाची गाळप वाढवले आहे आजूबाजूचे कारखाने आदिनाथ ला अडचणीत आणण्यासाठी याच परिसरात जास्त वाहने टाकत आहेत याची जाणीव संचालक मंडळाला असताना सुद्धा संचालक मंडळ डोळ्यावर पट्टी बांधून काम करीत आहे.यामुळे विद्यमान संचालक मंडळाला आदिनाथ कारखाना चालवायचा आहे का अजून बंद पाडायचा आहे याबद्दल शंका निर्माण होत आहे ची शंका ही बचाव समितीने व्यक्त केली आहे.बचाव समितीच्या वतीने संपूर्ण आदिनाथ चे कामकाजाची पाहणी करण्यात आली आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…