Categories: Uncategorized

आमदार. संजयमामा शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला- डिकसळ- कोंढार चिंचोली नविन पुलाचे ५५ कोटींचे टेंडर झाले फायनल.. लवकरच काम होणार चालु

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील तीन जिल्ह्यांच्या सिमेवर असणारा ब्रिटीश कालीन डिकसळचा पुल नुकताच खचला आणि वहातुक बंद झाली.. त्यामुळे प्रवासी नागरिक, विद्यार्थी , शेतकरी व सर्वसामान्यांना पर्यायी मार्गाचा जीवघेणा प्रवास सुरु झाला.. जुन्या पुलाचे डागडुजीची गरज ओळखून पूर्वीच यासाठी २ कोटी रुपये ची तरतुद आमदार. संजयमामा शिंदे यांनी करून ठेवली असुन त्याचेही काम लवकरच चालु होईल.. परंतु याच ठिकाणी आमदार. संजयमामा शिंदे यांनी नविन पुल आपले काळात बांधुन उभा करणेचे जनतेला आश्वासन दिले होते.. आघाडी सरकार मधे सामिल होवुन त्या साठी ५५ कोटी रुपयांची मंजुरी देखिल मिळवली होती.. याकामी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब यांची देखिल मदत घेतली होती, परंतु सरकार अचानक बदलले, कोरोनाचा दोन वर्षाचा काळ यामुळे या नविन पुलाचे काम होईल किंवा नाही असे प्रश्नचिन्ह होते.. परंतु जिगरबाज असणाऱ्या आमदार. संजयमामा शिंदे यांनी आपली ताकद पणाला लावत या कामाचे टेंडर मंजुर करून आणले आहे. लवकरच नविन पुलाचे कामाची टेंडर प्रक्रीया होऊन काम चालु होणार आहे.. याबाबतची माहीती मिळताच करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील कार्यकर्त्यानी आनंद व्यक्त केला असुन, संपुर्ण करमाळाकर या कामाचे कौतुक करीत आहेत.. आम्ही आमदार. संजयमामा शिंदे यांचे प्रयत्ना बद्दल आणि जिद्दीला सलाम तर करतोच परंतु आम्ही कायम त्यांचे ऋणात राहु अशी बोलकी प्रतिक्रिया काही जाणकार मंडळींनी दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago