करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील श्रीमती आनंदमती नेमचंद दोशी (वय-९७) यांचे .२६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निधन झाले आहे. त्यांचे मागे दोन मुले, सहा मुली, सुना, नातवंडे, परतंवडे असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव प्रेमळ व धार्मिक होता. जैन धर्माचे तत्त्वाचे विशेष पालन करून त्यांनी धार्मिक उपवासाचे व्रत या वयातही जपले होते. कोरोना महामारी वरही त्यांनी कोरोना झाला असता नाही आपल्या खंबीर मनाने इच्छाशक्तीच्या जोरावर या वयातही यशस्वीरित्या मात केली होती. वृद्धपकाळाने अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे. मनमिळाऊ प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्या अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचेवर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यांच्या मेनरोडवरील घरापासून उद्या सकाळी आठ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. प्रसिध्द आडत व सोन्याचे व्यापारी अशोक दोशी व प्रसिध्द कापड व्यापारी राजकुमार दोशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाबद्दल शहरातील व्यापारी वर्गाने दुःख व्यक्त करून श्रध्दांजली अर्पण केली आहे.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…