Categories: करमाळा

लोकसहभागातून गावाचा विकास होऊ शकतो – भास्करराव पेरे-पाटील

 

करमाळा प्रतिनिधी – करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी . पाटील ,उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण महाविद्यालय , करमाळा राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर व फिसरे ग्रामपंचायत, फिसरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात पाटोदा गावांचे आदर्श सरपंच मा. भास्करराव पेरे- पाटील यांचे आदर्शग्राम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत रोकडे हे होते. याप्रसंगी पेरे-पाटील यांनी बोलताना लोकसहभागातून गावाचा विकास होऊ शकतो असे सांगितले. तसेच काळाची पावले ओळखून आपण आपल्या वर्तनात परिवर्तन करणे आवश्यक आहे. ज्या सुविधा गावात उपलब्ध करून द्यायच्या असतील त्या सार्वजनिक पद्धतीने उपलब्ध करून दिल्यास त्या स्वस्तात मिळू शकतात तसेच गावात झाडे , रस्ते , पाणी , वीज , स्वच्छता त्यांनी दिलेल्या टॅक्सचा पुरेपूर मोबदला त्यांना दिला पाहिजे. स्त्रियांना सन्मान आणि निराधारांना आधार देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांनी वेळेचे महत्व व भास्करराव पेरे-पाटील यांनी त्यांच्या गावात राबवलेल्या योजना येथे राबवल्या गेल्या तर फिसरे गाव आदर्श गाव बनेल व त्याचा आदर्श इतर गावापुढे राहील असे मत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच संदीप नेटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी अनेक गावचे सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक व फिसरे गावचे सरपंच प्रदीप दौडे , उपसरपंच विजय अवताडे , सर्व ग्रामपंचायत सदस्य ‘ विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी , ग्रामस्थ , स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. एम.डी. जाधव यांनी केले तर आभार फिसरे गावचे ग्रामसेवक केवारे भाऊसाहेब यांनी मानले .

saptahikpawanputra

Recent Posts

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

12 hours ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

2 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

2 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

2 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

4 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

5 days ago