जेऊर प्रतिनिधी
माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नातून गावांतर्गत सिमेंट रस्त्यासाठी 46 लाख रुपये मंजूर झाले असून पहिल्या यादीत दहा गावांचा समावेश आहे. माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा मतदार संघातील गावांना गावांतर्गत सिमेंट रस्ते व बंदिस्त गटार या कामांसाठी जनसुविधा योजनेतून पाच कोटी रुपये निधीची मागणी केली असून यातील पहिल्या यादीत दहा गावांना निधी मंजूर झाला. जेऊर ( 9 लाख), निंभोरे (3 लाख), वांगी 2 (3 लाख), भाळवणी (3 लाख), कविटगाव (3 लाख), कोंढेज (3 लाख), कुंभेज (3 लाख), जातेगाव (3 लाख), घारगाव (3 लाख), रोपळे (3 लाख) या गावांमधील सिमेंट रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. तर जेऊर गावासाठी नागरी सुविधा अंतर्गत दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत.माजी आमदार नारायण पाटील यांच्या माध्यमातून जलजीवन योजना, जनसुविधा योजना व दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत निधीची मागणी केली असून लवकरच उर्वरित गावांना निधी मंजूर होणार आहे. पदावर नसतानाही माजी आमदार नारायण पाटील यांनी मतदार संघातील गावांना निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा चालू ठेवला असून यामुळेच करमाळा तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीवर पाटील गटाची सत्ता अबाधित आहे.सन 2019 नंतर ग्रामपंचायतीच्या सर्व टप्प्यात झालेल्या निवडणुकीत माजी आमदार नारायण पाटील यांचे नेतृत्वाखाली काम करणार्या ग्रामपंचायतींची संख्या सर्वाधिक असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…